NEET Re-Exam Result 2026 : नीट युजी 2026 पुर्नपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी घवघवती यश मिळवले आहे. तामिळनाडूतील 12 विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी, 390 हून अधिक गुण प्राप्त झाले आहेत.
दिल्ली : 17-07-2026
नीट युजी 2026 पुर्नपरीक्षेचा निकाल (NEET Re-Exam Result 2026)जाहीर झाल्यानंतर तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. यंदा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत देशभरात आपली छाप सोडली आहे. विशेष म्हणजे, 12 विद्यार्थ्यांनी 690 पेक्षा जास्त गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत तमिळनाडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावर्षी नीट परीक्षा सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
पेपरफुटीच्या आरोपानंतर आधीची परीक्षा रद्द कऱण्यात आली. त्यानंतर जून महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्यात आली. यासंपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढला होता. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
Table of Contents
राज्यात सर्वाधिक यश मिळवण्यामध्ये व्यंकटपथी वेलायुथम व्ही.ए.(NEET Re-Exam Result 2026 )
राज्यातील सर्वाधिक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्यंकटपथी वेलायुथम व्ही.ए. यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यांनी जवळपास परिपूर्ण पर्सेंटाईल मिळवत देशातील पहिल्या काही विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांच्या पाठोपाठ श्रीनिका व्ही. सुदार ए.एम. वनिषा सतीश, सबरी जी.एन., आर जयकृष्ण, संविथा पी., नविथाना व्ही. निखिल शिवानंथन एस. जननी श्वेता डी.आर. रोहित मॅथ्यू रबिंद्रराजन ई., जे. जयकृष्ण या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या यादीत इतर मागासवर्गिय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचाही समावेश असल्येने विविध घटकांतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे.
कट-ऑफ गुणांमध्ये वाढ (NEET Re-Exam Result 2026
यंदाच्या निकालातील सर्वात मोठा बदल म्हणजे कट-ऑफ गुणांमध्ये झालेली वाढ. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेशासाठी आवश्यक गुण सुमारे 30 ते 35 गुणांनी वाढल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यांदा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवले आहेत. त्यामुळे सरकारी तसेच नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यावेळी जास्त कठिण स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयासाठी अधिक प्रयत्न (NEET Re-Exam Result 2026
करिअर मार्गदर्शन क्षेत्रांतील तज्ञांच्या मते, 650 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा अनेक पटींनी वाढली आहे. त्याचप्रमाणे 600 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुणवत्ता यादीत मोठे बदल दिसून येत आहेत. याचा थेट परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होणार असून, चांगले गुण मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयासाठी अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. तामिळनाडूसाठी मात्र एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने राज्याकील एमबीबीएसच्या जागांमध्ये यंदा मोठी वाढ केली आहे. नव्याने जवळपास 950 जागा उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील एकूण एमबीबीएस जागांची संख्या जवळपास 14 हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिक संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू (NEET Re-Exam Result 2026
वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे आता लक्ष समुदसेशन प्रक्रियेकडे लागले आहे. अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून पुढील सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वेळेत अर्ज करणे आणि योग्य माहिती तपासणे हे प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे ठरणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नीट परिक्षेने स्पर्धेची तीव्रता स्पष्ट केली आहे. चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे गुणवत्ता यादी अधिक कठीण झाली आहे. वाढलेला कट-ऑफ आणि तीव्र स्पर्धा पाहता वैद्यकीय प्रवेशाचा प्रवास यंदा अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.