Pune MPSC Protestएमपीएससी आंदोलन संपताच पुणे पोलीसांची कारवाई, रोहित पवार, विवेकानंद पाटीलचं काय होणार ?

Pune MPSC Protest : पुण्यातील सुरू असणाऱ्या एमपीएससी आंदोलनाचा शेवट होताच, पुणे पोलीसांनी आंदोलकांवर मोठी कारवाई केली आहे. सरकार विरोधात चितावणीकोर वक्तव्य करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि वाहतुकीस अडथळा करणे अशा विविध कलमान्वये 15 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : 09-10-2026 

पुण्यात गेल्या काही दिवस एमपीएससी विद्यार्थ्यांचे (Pune MPSC Protest) आंदोलन सुरू होते. एस.एम. जोशी पूलावर आंदोलन कऱणाऱ्या 15 जणांविरूदध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलन करण्यासाठी पोलिसांना पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, भेटीदरम्यान त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यामुळे आंदोलन स्थगिती केल्याचे पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले होते.

मात्र सकारात्मक वाटाघाटी झाल्यानंतरही कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आंदोलन करण्यात आले. सरकार विरोधात चितावणीखोर वक्तव्य कऱणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि वाहतुकीस अडथळा करणे अशा विविध कलमान्वंये 15 जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गुन्हा दाखल कऱण्यात आलेल्यांमध्ये रोहित पवार यांचा समावेश नाही.

कोणा कोणावर गुन्हे दाखल ? (Pune MPSC Protest)

  • प्रमोद पाटील
  • अक्षय कांबळे
  • अनिकेत देशमाने
  • प्रवीण महादेव पाटील
  • ऋषिकेश गांगुर्डे
  • प्रियंका चौधरी
  • नितीन गिते
  • सोमनाथ चव्हाण
  • ओंकार पाटील
  • गजानन शेळके
  • अजित काकडे
  • सिद्धार्थ पंचांगे
  • संकेत कणसे
  • सिद्धार्थ जांभूळकर
  • साहेबराव क्षीरसागर

काय करण्यात आली ही कारवाई ? (Pune MPSC Protest)

एस.एम. जोशी पुलाजवळ आंदोलन कऱण्याच्या तयारीत असलेल्या आणि सार्वजनिक रस्त्यावर आंदोलन केल्याचा आरोप असलेल्या आणि सार्वजनिक रस्त्यावर आंदोलन केल्याचा आरोप असलेल्या 15 जणांविरूद्ध विश्रामबाग पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील नवी पेठ परिसरातील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोर 1 ऑक्टोबरला विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा तसेच जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी प्रतिनीधी प्रमोद पाटील आणि इतर विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी परवानगी मिळावी आणि इतर विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी परवानगी मिळावी म्हणून 25 सप्टेंबर रोजी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात निवेदन दिेले होते. अलका टॉकीज चौक, अहिल्या अभ्यासिका आणि एस.एम.जोशी पूल या तीन ठिकाणी आंदोलन कऱण्याचा पर्याय त्यांनी मांडला होता.

चर्चेनंतर एस.एम. जोशी पुलाजवळ 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन कऱण्यासाठी अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थी आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानाे मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेतली. या भेटीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती. मागण्या मान्य झाल्याने विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरचे नियोजन आंदोलन स्थगित केल्याचे लेखी पत्र पोलीस आयुक्त कार्यालयाला दिले. त्यानंतर आंदोलनासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द कऱण्यात आल्याचे पत्रही विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.

परवनागी रद्द, तरीही केले आंदोलन (Pune MPSC Protest)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने यांच्यासहअतर विद्यार्थी नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोर सार्वजनिक रस्त्यावर जमले होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी कऱण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडविण्याच्या घोषणा दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पुणे शहरात लागू असणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशांची तसेच नियोजित आंदोलनाची परवानगी रद्द झाल्याची माहितीही आंदोलनकर्त्यांना देण्यात आली होती. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून आंदोलन सुरू ठेवल्याचा आरोप फिर्यादीत कऱण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *