About Us

“हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पै जाहला”  असे संत कवी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. या ओळींचा अर्थ असा की, संपूर्ण विश्व हे माझे घर आहे आणि या संपूर्ण विश्वाला मी घरासारखे समजतो. सर्व विश्व माझे कुटुंब आहे. ‘मिसलेनियस भारत’ चा पर्यटना विषयीचा आमचा विचार ही असाच आहे. याच भावनेतून आम्ही जगभरातील पर्यटन, तेथील वैशिष्ट्य, जीवनमान यांचा पर्यटनाच्या माध्यमातून अभ्यास करून, तेथिल छायाचित्र घेऊन  ते आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती असते, स्वतःचा वेगळा इतिहास असतो, त्यानुसार तेथिल वारसास्थळं, जीवनमान आज वर्तमानात आपल्याला पहायला मिळतात. आज तो देश कसा आहे, पुर्वी त्यांचा इतिहास काय होता, तेथिल वारसास्थळांची वैशिष्ट्ये, विविध वारसास्थळांच्या निर्मितीच्या, त्यांच्या निर्माणकर्त्यांच्या कथा असा सगळा माहितीचा स्रोत घेऊन आम्ही मिसलेनियस भारतचा हा पर्यटनाचा प्रवास करत असतो. खरं तर हे जग फार विस्तीर्ण आणि विशाल आहे. सर्व देश विविधतेने नटलेले आहेत. प्रत्येक देशात, तेथिल शहरांत, ग्रामीण भागांत काहीना काहीतरी ऐतिहासिक वारसास्थळांचा ठेवा असतोच. प्रत्येक देशाची पौराणिक धार्मिक स्थळं, संग्रहालयं, उद्यानं अशी अनेक पर्यटन स्थळं असतात. ही पर्यटन स्थळं हीच त्या त्या देशातील शहरांची ओळख असतात. आज जगभरात अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत, ज्यांचे अस्तित्व काळाच्या ओघात धुसर होत आहे, मात्र त्याचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व मोठे असते. अशाच  परिचित, अपरिचित पर्यटन स्थळांना मी माझ्या कॅमेरा आणि शब्दातून मांडत आहे ते मिसलेनियस भारत या ब्लॉगच्या माध्यमातून. या ब्लॉगमध्ये संपूर्ण जगभरातील पर्यटन आणि जीवनमानाची माहिती असणार आहे. हा प्रवास माझ्यासारख्या  एका भारतीय प्रवाशाच्या लेखणीतून आणि कॅमेरातून उलगडलेला आहे. मिसलेनियस भारतच्या या जागतिक प्रवासातून वाचकांना कायम नवनविन माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मिसलेनियस भारतचा हा माहितीरूपी खजिना तुम्हाला नक्कीच आनंद देत राहिल.

Popular Posts:

Bank Of Baroda ED Action

Bank Of Baroda ED Action, Big News, 2026 : बॅंक ऑफ बडोदाच्या 360.50 कोटी कर्ज गैरव्यवहार प्रकरणात ईडीची मोठी कारवाई ; मुंबई, दिल्लीत 11 ठिकाणी छापेमारी

Bank Of Baroda ED Action : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुंबई विभागीय पथकाने बॅंक ऑफ बडोदाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोठी

Read More
Disha Salian Case Update

Disha Salian Case Update, Shocking News, 2026 : दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR दाखल, आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी : Disha Salian Case Fir Register By CBI

Disha Salian Case Update : दिशा सालियानाचा मर्डर झाला कि ती आत्महत्या होती ? याचे उत्तर गेली काही वर्ष सर्वांनाचा

Read More
Vinesh Phogat

Vinesh Phogat, Big News, 2026 : दिल्ली हायकोर्टाचा Vinesh Phogat ला मोठा धक्का ! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रायल देता येणार नाही : Vinesh Phogat Setback Delhi High Court Denies Interim Relief To participate in World Championship Trials

Vinesh Phogat : दिल्ली उच्च न्यायालयाने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपच्या निवड चाचण्यांमध्ये विनेश फोगाटला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. या

Read More