Pune MlC Election Result 2026 : पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉंग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपा उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे : 28-10-2026385 मतां
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत (Pune MlC Election Result 2026 ) कॉंग्रेस उमेदवार जयंत आसगावकर यांचा पराभव झाला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत जयंत आसगावकर यांना बाद घोषित करण्यात आलं. त्यांना 8 हजार 965 मतं मिळाली. आसगावकरांच्या पराभवामुळे कौस्तुभ गावडे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंची आघाडी कायम आहे. ते 18385 मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
सचिन सानप 11,983 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू आहे. शिक्षक मतदारसंघाच्या 25 फेऱ्या झाल्या आहेत. त्यात आसगावकर यांचा पराभव झाला. आता खरी लढत भाजपचे कौस्तुभ गावडे आणि एकनाथ शिंदे शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांच्यात आहे.
चार ते पाच उमेदवार दुसऱ्या फेरीत होते. त्यात जयंत आसगावकर बाद झाले. आज दुपारपर्यंत शिक्षक मतदारसंघाचा निकाल येऊ शकतो. पदवीधरचा निकाल संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत लागू शकेल. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या स्मिता जाधव यांना 1 लाख 2 हजार 427 मते मिळाली आहेत. हर्षदा जाधव यांना 1 लाख 11 हजार 279 मतं मिळाली आहेत.
कोटा पूर्ण करण्यासाठी 1816 मतांची गरज (Pune MlC Election Result 2026 )
पदवीधरमध्ये कोटा पूर्ण कऱण्यासाठी 1816 मतांची गरज आहे. आतापर्यंत 21 उमेदवार बाद झाले आहेत. पुढील मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. हर्षदा जाधव यांना कोटा पूर्ण कऱण्यासाठी आणखी 1 हजार 816 मतांची गरज असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या सुनील मोदी यांनी 3 हजार 66 मतं मिळाली आहेत. सोमनाथ साळुंके यांना 2 हजार 638 मतं मिळाली आहेत. नामदेव जाधव यांना 1 हजार 955, लक्ष्मण हरणावळ यांना 1 हजार 471 मतं मिळाली आहेत.