PM Awas Yojana Graminसामान्यांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, शासनाकडून कोटींचा निधी.

PM Awas Yojana Gramin : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 20,165 लाभार्थ्यांना हक्काच्या घराच्या बांधकामासाठी 107 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळणार ? काय आहेत फायदे जाणून घ्या.

दिल्ली : 17-07-2026

प्रधानमंत्री आवाज योजनेबाबत (PM Awas Yojana Gramin) मोठी बातमी आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब आणि बेघर कुटुंबांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची योजना, गरजू लोकांना दिलासा देत आहे. या संदर्भात, सरकारने घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य देऊन या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नेमकी काय आहे ही योजना ? कोणा कोणाला यातून लाभ होऊ शकतो ? याची माहिती घेऊ.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 20,165 लाभार्थ्याच्या बँक खात्यांमध्ये 107 कोटी रुपये हस्तांतरित केले गेले आहेत. घरबांधणीसाठी पहिला हप्ता म्हणून ही रक्कम वितरित कऱण्यात आली, त्यामुळे हजारो कुटुंबांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

19 योजनांअंतर्गत 50,20,460 लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये एकूण रुपये 1,582.16 कोटी हस्तांतरीत कऱण्यात आले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण ही योजनाही प्रमुख होती. ज्याअंतर्गत पात्र कुटुंबांना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. चंदीगढ येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी विविध सार्वजनिक कल्याणकारी योजनांअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे निधी हस्तांतरित केला.

आतापर्यंत रुपये 827 कोटींहून अधिक मदत (PM Awas Yojana Gramin)

हरियाणा सरकारच्या माहितीनुसार, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राज्यात आतापर्यंत 827.220 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात 76,466 घरांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 41,260 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 35,206 घरांचे बांधकाम सुरू आहे. सरकारचे म्हणणे आहे की, वेळेवर हप्ते वितरित केल्याने बांधकामाला गती मिळेल आणि पात्र कुटुंबे लवकरच पक्क्या घरात राहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील.

प्रधानमंत्री आवास योजनेविषयीची माहिती (PM Awas Yojana Gramin)

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र सरकारची एक प्रमुख गृहनिर्माण योजना आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या, कच्च्या घरात राहणार्या किंवा बेघर कुटुंबांना टप्प्याटप्प्याने घरबांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात DBT द्वारे हस्तांतरित केली जाते, ज्यामुळे पारदर्शकता रहाते, मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येते.

या योजनेचा लाभ कोणाला मिळतो ? (PM Awas Yojana Gramin)

सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणनेच्या आधारार निवडलेल्या पात्र ग्रामीण कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो. बेघर कुटुंबे, कच्च्या घरात राहणारी कुटुंबे आणि सरकारने ठरवलेल्या इतर पात्रता निकषांनुसार प्राधान्य दिले जाते. ग्रामसभेच्या शिफारशी आणि एका विहित कार्यपद्धतीनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाते.

आर्थिक मदत कशी मिळते ? (PM Awas Yojana Gramin)

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत, मंजूर लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मदत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये मिळते. बांधकामाच्या प्रगतीनुसार प्रत्येक हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत केला जातो. या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक सहाय्य देणे हाच नाही, तर ग्रामीण कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानजनक घरे उपलब्ध करून देणे हा देखील आहे.

योजनेला पात्र लाभार्थ्यांसाठी सूचना (PM Awas Yojana Gramin)

जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) साठी अर्ज केला असेल किंवा पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील तुमचा समावेश असेल, तर संबंधित विभागाकडे किंवा अधिकृत पोर्टलवर तुमच्या अर्जाची आणि हप्त्यांची स्थिती नियमितपणे तपासा. वेळेवर आर्थिक सहाय्य मिळाल्यास, कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय घरांचे बांधकाम पूर्ण करता येते. हरियाणा सरकारने वितरित केलेली ही सहाय्य रक्कम हजारो पात्र कुटुंबांना त्यांच्या कायमस्वरूपी घराचे स्वप्न साकार कऱण्यास मदत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!