Shravani Kudale NEET Topperबारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत राज्यात पहिली, मान्यवरांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा.

Shravani Kudale NEET Topper : श्रावणी कुदळे हीने राज्यात नीट परीक्षेत पहिले येऊन मोठे यश संपादन केले आहे. श्रावणीने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा पास केली आहे. फक्त परीक्षात पास नाही केली तर श्रावणी देशात पाचवी तर मुलींमध्ये देशात पहिली आली आहे.

बारामती : 18-07-2026

यावर्षीची नीट परीक्षा सर्वार्थाने गाजत आहे. पेपरफुटीमुळे (Shravani Kudale NEET Topper) या परीक्षेला गालबोट लागले होते. पुर्नपरीक्षेचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळेने हे घवघवीत यश संपादन केले आहे. तिचे आई-वडील यांचाही या यशात मोठा वाटा आहे. कृष्णा कुदळे आणि जयश्री कुदळे हे तिचे आई-वडील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत. मुलीने इतकं मोठं यश संपादन करेल असं वाटलं नव्हतं तिने यश संपादक केलं. त्याचं कौतुक होतय, असे तिच्या पालकांनी म्हटले. तसेच, उपमुख्यमंत्री आणि बारामतीच्या आमदार सुनेत्रा पवार यांनी फोनवरून तिचे अभिनंदन केले.

पहिल्याच प्रयत्नात यश  (Shravani Kudale NEET Topper)

श्रावणीने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा पास केली आहे. फक्त परीक्षाचे पास नाही केली तर श्रावणी देशात पाचवी तर मुलींमध्ये देशात पहीली आली आहे. श्रावणीने 720 ते 710 मार्क मिळवले आहेत. बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मार्क, केमेस्ट्री मध्ये 180 पैकी 175 तर फिजिक्स 180 पैकी 175 मार्क मिळाले आहेत. श्रावणीने रोज कॉलेज वगळता रोज 6 तास अभ्यास केला आहे. तसेच अनेक आवडी निवडीच्या गोष्टींना आळा घालत तिने या यशाला गवसणी घातली आहे.

आठवीत असताना तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. तसेच पहिली परीक्षा देताना पेपर लिक झाला त्याचा तिला अजिबात त्रास झाला नाही, असेही तिने सांगितले.

श्रावणीचे आईवडील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. आजा श्रावणीने जे यश मिळालं आहे, त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. श्रावणी ही मूळची दौंड तालुक्यातील खडकी गावाची पण तिने अभ्यास हा बारामतीतील अकॅडमीत केला, तिच्याबद्दल तिचे शिक्षक भरभरून बोलतात. अवघड अशा नीट परीक्षेत श्रावणीने घवघवीत यश संपादित केले आहे. तिला आता डॉक्टर बनायचं आहे, ती आता पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाणार असून तिला डॉक्टर बनून देशसेवा करायची आहे.

सुनेत्रा पवारांनी श्रावणीला फोन ( Shravani Kudale NEET Topper)

श्रावणीच्या या उल्लेखनीय यशाबद्द महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रावणी कुदळे हिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रावणीच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या तिच्या शिक्षकांचेही अभिनंदन केले. तसेच, ” दिवगंत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खुप अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत.” अशी भावनाही त्यांनी व्यकत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!