Maharashtra Rain 2026

Maharashtra Rain 2026 : राज्यात आज पावसाचे पुन्हा दमदार एंन्ट्री घेतली आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा होती. अनेक भागात रात्री पाऊस झाला आहे. सकाळीही ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई : 15-07-2026

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने (Maharashtra Rain 2026 ) पाठ फिरवली. त्यामध्येच आज काही भागात पाऊस झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सून पुढे प्रगती करू शकत नव्हता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज मध्ये महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी बरसण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. जम्मू, डेहराडून, पटना ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात काही भागात उष्णता वाढताना दिसली. राज्यात 20 जूलैनंतर पुन्हा एकदा पूर्ण मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला.

या ठिकाणी पावसाची शक्यता (Maharashtra Rain 2026 )

रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा घाटमाथा, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज मोठा इशारा दिला. 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पुणे शहराची पाणीकपात तुर्तास टळली (Maharashtra Rain 2026 )

पुणे शहरावरील पाणी कपात तुर्तास टळली आहे. पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आली. एक दिवसाआड पाणीपुरवठा कऱण्याचा पालिकेचा विचार होता. मात्र, गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58 % पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

अकोला जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा एंन्ट्री घेतली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. भर पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही अनेक भागांत पुरेसा पाऊस पडत नव्हात. सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!