Pune FDA Raid Newsपुण्यात FDAची मोठी धाड, शॅम्पू, केमिकल मिसळून तयार होत होतं दूध.

Pune FDA Raid News : पुण्यात अन्न व प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहेय तब्बल 2 कोटी रुपयांच्या बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. शॅम्पू, रिफांईड तेल, डिटर्जंट आणि विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात होते, असे तपासात उघड झाले आहे. या कारवाईत मोठया प्रमाणात बनावट दूध, रसायने आणि उत्पादनांसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त कऱण्यात आले आहे.

पुणे : 15-07-2026

पुण्यात एक मोठ्या भेसळीच्या रॅकेटचे (Pune FDA Raid News) षडयंत्र उघड करण्यात आले आहे. अन्न भेसळविरोधात मोठ्या कारवाईत, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात दुधातील भेसळीचे आंतर-जिल्हा रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकऱणी 13 जणांना अटक करण्यात आली असून 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस आणि एफडीएने संयुक्तपणे मंचर, अकलूज, अहिल्यानगर, सिल्लोड आणि सांगली येथे छापे टाकले. ही कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या 30 सदस्यीय पथकाने केली, त्यांना एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांनी मदत केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भेसळयुक्त दुधाच्या अवैध उत्पादन आणि पुरवठ्याबाबतच्या सखोल तपासानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासात सहभागी असेलल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे रॅकेट अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते आणि मोठ्या प्रमाणावर बाजारात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करत होते.

पुण्यात छापेमारी (Pune FDA Raid News)

पुणे जिल्ह्यात एफडीएच्या पथकांनी सोलापूरच्या सांगोला येथील एका उत्पादन युनिटमधून दूध घेऊन जाणाऱ्या टॅंकरची तपासणी केली. दूधाचे नमुने घेण्यात आले आणि भेसळीच्या संशयावरून 28,498 लिटर दूध जप्त कऱण्यात आले, ते नाशवंत असल्याने नष्ट कऱण्यात आले.

अहिल्यानगर येथील एका संकलन केंद्रातूनही भेसळीचा संशय असलेले 24,498 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चुकीचे लेबल लावणे, भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून 92,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त विविध खाद्यपदार्थ जप्त कऱण्यात आले.

नैसर्गिक दुधात भेसळयुक्त कृत्रिम दूध (Pune FDA Raid News)

तपासात असे आढळून आले की, आरोपी ग्राहकांना पुरवठा करण्यापूर्वी प्रत्येक 1,000 लिटर नैसर्गिक दुधात अंदाजे 500 लिटर कृत्रिम दूध मिसळत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे कृत्रिम दूध रसायने, मिल्क पावडर, शॅम्पू आणि इतर घटकांचा वापर करून बनवले जात होते.

एफडीएने तपास सुरू (Pune FDA Raid News)

एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकारामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. अधिकाऱ्याने सांगितेल आहे की, अशा भेसळीमुळे केवळ ग्राहकांची फसवणूक होत नाही. तर सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होतो. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या देखरेखेखाली ही संयुक्त कारवाई कऱण्यात आली.

या रॅकेटमागील मोठे नेटवर्क, त्याचे निधीपुरवठा दुवे आणि पुरवठा साखळी उघडकीस आणण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भेसळयुक्त दूध पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतील डेअरी, विक्रेते किंवा इतर माध्यस्थांना पुरवले जात होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत. तपास पुढे सरकल्यावर आणखी अटक होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“फलटण आणि सातारा येथे अचानक केलेल्या तपासणीदरम्यान, आमच्या पथकांनी एका गोठ्याची पाहणी केली असता, दुधात भेसळ कऱण्यासाठी व्हे पावडर, स्प्रे-ड्राइड उत्पादने आणि इन्स्टंट टी-कॉफी क्रिमरचा वापर केला जात असल्याचे आढळून आले, ” अशी माहिती एफडीए, पुणे विभागाचे सहनिरीक्षक दिगंबर भोगवाडे यांनी टीओआयला दिली. फलटण पोलीस ठाण्यात मालक आणि पावडर पुरवठादारासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!