Raj Thackery Support Wanghchukसोनम वांगचूक यांना राज ठाकरेंचा पाठिंबा, पोस्ट करत सरकारवर टिका .

Raj Thackery Support Wanghchuk : गेल्या दोन आठवड्यांपासून सोनम वांगचूक यांचे जंतर मंतर येथे उपोषण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारवर तीव्र टिका केली आहे. वांहचुक यांच्या ढासळत्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना या गंभीर सामाजित प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.  विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत, असे मत त्यांनी मांडले.

मुंबई : 16-07-2026

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक (Raj Thackery Support Wanghchuk) हे दिल्ली येथील जंतरमंतर येथे बेमुदत संपावर उपोषणाला बसले आहे. सरकारने अद्याप त्यांच्या कोणत्याही मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. मात्र आता त्यांच्या समर्थनार्थ अनेक कलाकार, राजकीय पुढारी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्व असणारे मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ हे आता सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहे.

पेपरफुटी आणि शैक्षणिक घोटाळ्यांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. 59 वर्षीय वांगचूक यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. त्यांची तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात मत मांडत सरकारवर चीका केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहीली आहे.

सोनम वांगचूक हे ज्या मुद्यांसाठी आमरण उपोषण करत आहेत. ती रास्त मागणी आहे आणि सरकारने ती मागणी मान्य केली पाहिजे, असं मत राज ठाकरेंनी पोस्टमधून व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले आहेत राज ठाकरे ?    (Raj Thackery Support Wanghchuk)

सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा हा आजचा 19 वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतयं की सरकारने सोनम वांगचूक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे.

हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांपणे बघू शकते, तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.

ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्याक घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्या माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्या पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत.

उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकियांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्दयासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्यांच्या शरीराचे हाल करण हे सरकारला सहज सोपं आहे, असं ते म्हणाले.

त्यांच्या सोयीचा असेपर्यंत भाजपला तो माणूस प्रिय असतो. (Raj Thackery Support Wanghchuk)

सोनम वांगचूक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचूक यांना 2018 साली री-इव्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं, अर्थात तेव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्त्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचूक चालले.

पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचूक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचूक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.

आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली मर्यादा सत्ता.

भाजपला माज आला आहे (Raj Thackery Support Wanghchuk)

निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वतच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आओहे अशी टिका राज ठाकरे यांनी केली आहे.

पंतप्रधानांना केली विनंती (Raj Thackery Support Wanghchuk)

माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे आणि हे अत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाही आहे. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार, त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पहात आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे.

सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहात याचा आनंद व्यक्त केला जात आहे. किती दिवस पंतप्रधानपद हा एक आकडा आहे दुसरं काही नाही ! आज अशा विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे. आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्याने देशाच्या हातात काहीच पडत नाही ! असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.

सोनम वांगचुक यांची मागणी अजिबात चुकीची नाही आणि नीट पेपर फुटीचा मुद्दा ज्या दिवशी फुटला त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पण त्याच मागण्या केल्या होत्या. पण खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मीडियावर अडकली लागली आहे. या देशातील सिव्हिल सोसायटीने उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. त्यामुळे या देशातील मोठा सुजाण समाज राजकारणापासून दूर जाऊन लाईक्स, शेअर यातच अडकला आहे.

आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता हे लोकं स्मशान शांततेकडे नेतील

पण मी हे नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रिनच्या बाहेर यावं, सजग व्हायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली नेहमीच करतात. कुठल्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझ्या पक्ष उभा राहिला आहे आणि यापुढे राहील. पण एकुण समाजाने पुढे यायला हवं, असंही राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!