Vanrang 2026 Mumbaiदक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्धाटन .

Vanrang 2026 Mumbai : नरिमन पॉईंट येथे 3 दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक उत्सवाला सुरूवात झाली असून मंत्री नरहरी झिरवाळांच्या पुढाकाराने आदिवासी कला अन उत्पादनांना प्राइम प्लॅटफॉर्म मिळाले आहे.

मुंबई : 07-08-2026

महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉइंट येथील प्रतिष्ठित वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026 रोजी तीन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक व पारंपरिक उत्सव ‘वनरंग 2026’ चा (Vanrang 2026 Mumbai)  अत्यंत भव्य आणि उत्साही ‘वनरंग 2026’ अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात शुभारंभ झाला.

या भव्य उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभळी.

दुर्गम जंगले, डोंगर दऱ्या आणि ग्रामीण भागांत जपलेली कला, हस्तकला आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा देशातील सर्वात महागड्या व प्राईम लोकेशनवर थेट पोहोचवणारा हा सोहळा 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांसाठी आयोजिक करण्यात आला आहे.

थेट आर्थिक लाभावर भर (Vanrang 2026 Mumbai)

भिल्ल, कोकणा, ठाकर आणि गोंड या जमातींची समृद्ध जीवनशैली आणि कला या महोत्सवाच्या केंद्रस्थानी आहे. या आयोजनाच्या माध्यमातून  आदिवासी कारागीर, वैद्य, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळाली आहे.

हस्तकला, पारंपरिक वारली व गोंड चित्रकारी, सेंद्रीय शेती उत्पादने आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींच्या विक्रीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ थेट कारागिरांच्या बँक खात्यात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार आणि आर्थिक बळ मिळणार आहे.

मंत्री नहरही झिरवळ यांच्या दृरदृष्टीचे यश (Vanrang 2026 Mumbai)

आदिवासी समाजाचा विकास, हक्क आणि त्यांच्या कलेला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या विशेष पुढाकाराचे या प्रसंगी कौतुक करण्यात आले. झिरवाळ यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागांत भारतातील पहिले ‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’ आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) साकारू शकली आहे. ज्यामुळे स्थानिक आदिवासी तरूणांसाठी शिक्षण आणि थेट रोजगाराचे मार्ग खुले झाले आहेत.

तीन दिवसांचे प्रदर्शन (Vanrang 2026 Mumbai)

7 ते 9 ऑगस्ट दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत रंगणाऱ्या या महोत्सवात :

महाराष्ट्रातील भिल्ल, कोकणा, ठाकर, गोंड या चार प्रमुख जमातींच्या जीवनशैलीचे प्रदर्शन आणि इतिहासाचा पट मांडणारी भव्य प्रदर्शने, 12 इतर राज्यांतील हस्तकलेचे स्‍टॉल्स उभारण्यात आले आहेत.

मरीन ड्राइव्हवर प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांच्या हस्ते ‘ जनजातीय मोझॅक आर्ट इस्टॉलेशन ‘साकारण्यात आले आहे.

प्रख्यात छायाचित्रकार कोलस्टन ज्युलियन यांनी गेल्या 30 महिन्यात टिपलेल्या छायाचित्रांवर आधारित ‘वनरंग फोटो बुकचे’ प्रकाशन कऱण्यात आले.

कार्यशाळा, मास्टरक्लास आणि ‘ट्रायबल लंच’ (Vanrang 2026 Mumbai)

महोत्सव काळात पद्मश्री राहीबाई पोपरे (बीजमाता), पद्मश्री भिकल्या लाड्या धिंडा तसेच मे 2026 मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्रातील पहिले आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या विशेष कार्यशाळा आयोजित कऱण्यात आल्या आहेत. यासोबतच अर्जुन पुरस्कार विजेती ॲथलीट कविता राऊत यांच्या उपस्थितीत क्रीडा क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा आणि वारली-गोंड पेंटिगच्या थेट कार्यशाळा होत आहेत. 9 ऑगस्ट रोजी ताजचे शेफ रघु देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक पदार्थांचा ‘ट्रायबल लंच’ही सादर केला जाणार आहे.

‘वनरंग पुरस्कार 2026’ चे विजेेते (Vanrang 2026 Mumbai)

समाजात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल खालील मान्यवरांना प्रतिष्ठित ‘वनरंग पुरस्कार 2026’ ने सन्मानित करण्यात येत आहे :

  • स्वदेश फाऊंडेशन : 1000 गावांच्या विकासासाठी
  • पद्मश्री भिकल्या धिंडा : जीवनगौरव पुरस्कार
  • अनिल वसावे : क्रीडा क्षेत्रातील कामगिरी (माऊंट एव्हरेस्ट गिर्यारोहक)
  • पी.अनबलगन (IAS) : औद्योगिक क्रांती आणि योगदान

या प्रसंगी राज्यपाल विष्णू देव वर्मा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी उपस्थिती राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!