Suprem Court VS CJP Protes : संसद मोर्चादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायलयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना फटकारले. ” तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात, आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही, ” असे स्पष्ट शब्दांत न्यायलयाने म्हटले आहे. तसेच वकिलांनी कायदेशीर मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत कऱण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्ली : 22-07-2026
सर्वोच्च न्यायलयाने कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनासंदर्भात एक याचिका दाखल कऱण्यात आली. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत (Suprem Court on CJP Protest) यांनी, आपण कोणतेही व्हिडिओ पाहणार नाही असे सांगून, ही याचिका ऐकण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. याचिकाकर्त्याने सोमवारी संसदेच्या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षांचा उल्लेख केला होता.
न्यायलयात हजर असेलल्या वकिलांनी व्हिडिओ सादर कऱण्याची आणि गुरूवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. बार ॲंड बेंचच्या म्हणण्यानुसार, ते म्हणाले, ” माझ्याकडे पोलिसांच्या क्रूरतेशी संबंधित व्हिडिओ आहेत.. जर हे प्रकऱण उद्या सुनावणीसाठी सूचीबद्ध केले गेले.. तर तिथे विद्यार्थीही उपस्थित होते.” सरन्यायाधीशांच्या बॅनरखाली झालेल्या आंदोलनात अनेक पोलिस आणि विद्यार्थी जखमी झाले होते.
सरन्यायाधीश नेमके काय म्हणाले ? (Suprem Court on CJP Protest)
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गुरूवारी याचिका विचारात घेण्यास नकार दिला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ते म्हणाले, “आमचा किंवा तुमचा वेळ वाया घालवू नका,” ते म्हणाले, ” उद्या आमच्याकडे वेळ नाही. आम्हाला कोणतेही व्हिडिओ पहायचे नाहीत”.
काय आहे प्रकरण ? (Suprem Court on CJP Protest)
जून महिन्यापासून जंतर-मंतर येथे आंदोलन कऱणाऱ्या कॉक्रोच जनता पक्षाने (CJP) सोमवार, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा कढण्याची घोषणा केली. या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 186 जखमींना राम मनोहर लोहिया रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. यापैकी 89 जण पोलीस अधिकारी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 118 पोलीस कर्मचारी जखमी झाले.
सीजेपी प्रवक्ता सौरभ दास यांचा आरोप (Suprem Court on CJP Protest)
मंगळवारी, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी आरोप केला की, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलकांवर पेलेट गनचा वापर केला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर पेलेट गनच्या जखमांचे वैशिष्ट्यपूर्ण व्रणही दिसत आहेत. यानंतर, दिल्ली पोलिसांनी एक्स वर ‘फेक न्यूज अलर्ट’ जाहीर करून प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी म्हटले, ” पोलीस दल शांततापूर्ण आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करत असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल कऱणाऱ्या आहेत.”
सोशल मीडियावर आणखी एका पोस्टमध्ये एका व्यक्तीने दावा केला की,आरएएफ (रॅपिड ॲक्शन फोर्स) ने आंदोलकांवर स्टन गनचा वापर केला. पोलिसांनीही हा दावा फेटाळून लावला आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, “आरएएफने आंदोलकांवर इलेक्र्टिक स्टन गन वापरल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल कऱणारे आहे”.