Delhi CJP Protest Updateजंतरमंतरवर अजूनही पेच, इंटरनेट बंद, विद्यार्थी आक्रमक,CJP चे पोलिसांवर आरोप .

Delhi CJP Protest Update : जंतरमंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी राजधानीतील अनेक संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. त्याचप्रमाणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित कऱण्यासाठी मेट्रो स्थानकांवरही खबरदारी उपाय योजण्यात आले आहेत.

दिल्ली : 23-07-2026 

कॉकरोच जनता पार्टीच्या 20 जुलैच्या मोर्चानंतर आज (22 जुलै) (Delhi CJP Protest Update ) रात्री साडेआठच्या दरम्यान जंतरमंतरवर पुन्हा एकदा बराच गोंधळ झाल्याचे पहायला मिळत आहे. दिल्ली पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे पहायला मिळाले.

त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतरही वातावरण तणावपूर्ण बघायला मिळत आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) मुख्य प्रवक्के आशुतोष रांका यांनी जंतरमंतर परिसरातील आज सकाळचे ताजे फोटो शेअर करत पोलिसांच्या कारवाईनंतर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया पोस्टमधून दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. ” काल दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरबाहेर प्रदर्शन कऱणाऱ्या आंदोलकांवर अत्यंत कठोर कारवाई केली. या भागात इंटरनेच सेवा बंद कऱण्यात आली असून लोकांवर अमानुषपणे लाठीहल्ला कऱण्यात आला. तरीही, आज सकाळी जंतरमंतर आंदोलकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.”

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील :  अभिजित दिपके (Delhi CJP Protest Update )

सीजेपी प्रमुख अभिजित दिपके म्हणाले की, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही.

कालच्या राड्यानंतर आता जंतर मंतर येथे होणार्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक कऱण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, दिल्ली मेट्रोची अनेक प्रमुख स्थानके आज सकाळी 7:30 पासून पुढील सुचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे, कार्यालय, महाविद्यालय किंवा इतर महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी घरातून निघण्यापूर्वी आपला मार्ग तापासावा.

कोणती मेट्रो स्थानके बंद राहणार ? (Delhi CJP Protest Update )

दिल्ली मेट्रोनुसार, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम  कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके सकाळी 7:30 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवर प्रवाशांसाठी केवळ इंटरचेंज सुविधा उपलब्ध असेल. या स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार नाही.

यापूर्वी, काल रात्री सुमारे 8 वाजेपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलकांची संख्या 3,000 ते 4,000 पर्यंत वाढली होती आणि रात्री उशिरापर्यंत ती वाढतच राहिली. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तेथे मोठ्या संख्येने “समाजकंटक” जमले होते. यापैकी काही आंदोलकांनी आधी बॅरिकेडस तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर,हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

या संघर्षात दोन एसपी, दोन इनस्पेक्टर आणि एका कॉन्स्टेबलसह पाच पोलीस जखमी झाले. अनेक आंदोलकही जखमी झाले. नवी दिल्लीतील जंतर-मंतर, टॉलस्टॉय मार्ग आणि पार्लमेंट मार्गावरील एनडीएमसी इमारतीसमोर जमाव जमला होता. सुत्रांनुसार, परिस्थिती शांत कऱण्यासाठी पोलिसांनी सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याशी चर्चा केली, परंतु जमावाने त्यांचेही ऐकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!