US Iran Warपुनःश्च युद्ध ! अमेरिकेच्या नव्या कारवाईनंतर इराण आक्रमक; खाडी देशांमध्ये तणाव शिगेला.

US Iran War : परत एकदा अमेरिका-इराण संघर्ष अधिकच चिघळला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल आखाती देशांमध्ये अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन/तेहरान : 15-07-2026

अमेरिका-इराणमधील (US Iran War) संघर्ष चिघळत चालला असून सलग चौथ्या दिवशीही दोन्ही देशांत हवाई हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. यामुळे मध्यपूर्वेतील वातावरण अस्थिर झाले आहे.

हल्ले सुरूच (US Iran War)

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी जहाजांवरील हल्ले कऱण्याची इराणची क्षमता कमी कऱण्यासाठी आणि आखाती देशांतील सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्लानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने जॉर्डन, बहरीन आणि कुवैतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक गडद झाला आहे.

इराणच्या अनेक मह्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले (US Iran War)

इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हेंगाम बेट, बंदर अब्बास, अहवाज आणि केशम बेटावर जोरदार स्फोट झाले आहेत. याशिवाय अमेरिकने काही दिवसांपूर्वी बुशेहर आणि चाबहारसब काही किनारी भागांमध्ये हवाई हल्ले केले होते. अमेरिकेने मध्यपूर्वेत 20 हून अधिक युद्धनौका आणि शेकडो लढाऊ विमाने तैनात केली असून इराणला सतत लक्ष्य केले जात आहे.

अमेरिकेने लष्करी तळांवरही हल्ले (US Iran War)

दुसरीकडे इराणने देखील अमेरिकेने हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. IRGC ने बहरीनमधील शेख ईसा एअर बेस आणि जॉर्डनमधील अजराक एअरबेसवर क्षेपणास्र आणि ड्रोन डागल्याचा दावा केला आहे.

कुवैतमधील अली अल सलेम एअर बेसला लक्ष्य करण्यात आले असून अमेरिकेचे एमक्यू-9 ड्रोन लॉन्च पॅडही पाडले असल्याचे इराणने म्हटले. अमेरिकेचे हल्ले जोपर्यंत सुरू राहतील तोपर्यंत इराणही कारवाई सुरूच ठेवले असे IRGC  ने म्हटले आहे.

होमुर्झ सामुद्रधुनीत तणाव कायम (US Iran War)

याचवेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतही तणाव कायम आहे. आतापर्यंत तीनहून अधिक व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले असून यातील एका जहाजावरील हल्ल्यात एक भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. यावर भारताने नाराजी व्यक्त केली असून तातडीने हल्ले थांबवण्याती मागणी केली आहे.

तर इराणने होमुर्झमध्ये अमेरिका लष्कराची उपस्थिती कायम राहिल्याल तेल आणि वायुच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!