Kajal Dhochak U20भारताच्या काजल धोचकने गाजवली वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा, U20 मध्ये सलग दुसरे सुवर्ण.

Kajal Dhochak U20 : भारताच्या क्रिडा विश्वामध्ये एक आनंदाची बातमी आहे. स्लोव्हाकियामध्ये झालेल्या अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धेत, काजल धोचकने 76 किलो वजनी गटात चीनच्या जिंगरू सनचा 7-0 ने पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

स्लोव्हाकिया : 21-08-2026

भारतीय महिला कुस्तीपटू काजल ढोचकने (Kajal Dhochak U20) अंडर-20 कुस्ती विश्वचॅम्पियनशिपमध्ये (U20Wrestling World Championship ) 76 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. काजलने अंतिम सामन्यात चीनच्या जिंगरू सनचा 7-0 ने पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले. यासह, ती सलग दुसऱ्यांदा अंडर- 20 विश्वविजेतेपद पटकावले. यासह, ती सलग दुसऱ्यांदा अंडर-20 विश्वविजेती बनवणाऱ्या निवडक भारतीय महिला कुस्तीपटूंच्या गटात सामील झाली आहे.

जबरदस्त कामगिरी करत पुन्हा चॅम्पियन (Kajal Dhochak U20)

18 वर्षीय काजलने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले आणि एकाही लढतीत एकही गुण गमावला नाही. अंतिम सामन्यात, तिने चीनच्या जिंगरू सनला सुरूवातीपासूनच दबाव निर्माण केला. तिने शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत 7-0 ने हा सामना जिंकला. काजलने अंतिम सामन्याच्या सुरूवातीलाच स्टेप-आउट करून एक गुण मिळवला.

त्यानंतर तिने डबल-लेक अटॅक वापरून टेकडाऊन करत आणखी दोन गुण मिळवले आणि पहिल्या पीरियडच्या अखेरीस 3-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत, सनला ‘ओपन हँडसने’ हल्ला केल्याबद्दल चेतावणी मिळाली, ज्यामुळे काजलच्या खात्यात आणखी एक गुण जमा झाला. त्यानंतर काजलने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. तिने सनला मॅटवरून ढकलून आणखी एक गुण मिळवला आणि मग टेकडाऊन करून आपली आघाडी 7-0 अशी वाढवली.

हे काजलचे सलग दुसरे अंडर-20 विश्व चॅम्पियनशिप विजेतेपद आहे. तिने 2025 मध्ये 72  किलो वजनी गटात सुवर्णपद जिंकले होते. यावर्षी, तिने आपला वजनी गट बदलून गट 76 किलो केला आणि त्यातही ती यशस्वी ठरली. काजलच्या प्रभावी कामगिरीमध्ये 2024 च्या अंडर -17 विश्व चॅम्पियनशिपमधील 69 किलो वजनी गटाच्या विजेतेपदाचाही समावेश आहे. या विजयामुळे, ती अंडर -20 स्तरावर दोन वेळा विश्वविजेता होणारी दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.

सलग पटकावले पाच सुवर्णपदक (Kajal Dhochak U20)

काजलची 2026 मधील प्रभावी कामगिरी सुरूच आहे. अंडर-20 विश्व चम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे यावर्षीच तिचे सलग पाचवे सुवर्णपदक आहे. यापूर्वी , तिने अंडर-23 आशियाई चॅम्पियनशिप, उलानबातर रॅंगिक सिरीज, अंडर-20 आशियाई चॅम्पियनशीप आणि बुडापेस्ट रँकिंग सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकली होती. परंतु, तिराना रँकिंग सिरीज आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ती सातव्या स्थानावर राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!