Digital India In NewZealand : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे आपल्या दौऱ्यादरम्यान एक ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी सांगितले की, भारत आणि न्यूझीलंड डिजिटल क्षेत्रात आपले द्विपक्षीत संबंध नव्या उंचीवर नेत आहेत.
न्युझीलंड : 11-07-2026
भारताच्या (Digital India In NewZealand) स्वदेशी आणि अत्यंत लोकप्रिय डिजीटल पेमेंट प्रणाली म्हणजेच ‘युनिफाइड पेमेंटस इंटरफेस’ने आता जागतिक स्तरावर आणखी एक मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ऐतिहासिक न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान ऑकलंड येथून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारताची उत्कृष्ट युपीआय सेवा आता लवकरच न्यूझीलंडच्या वेगवान पेमेंट नेटवर्कशी थेट जोडली जाणार आहे. गेल्या 40 वर्षातील कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा असून, या दौऱ्यात दोन्ही देशांमधील डिजीटल आणि आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळाली आहे.
न्युझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आयोजित केलेल्या एका शानदार स्नेहभोजनदरम्यान पंतप्रधान मोदींनी या ऐतिहासिक डिजीटल भागीदारीची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण पावलामुळे केवळ येथे राहणाऱ्या भारतीय समुदायालाच नव्हे, तर स्थानिक व्यावसायिकांना आणि दोन्ही देशांमधील पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे. भारत सरकार आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा विस्तार जगभरात करत असून, न्यूझीलंडशी झालेली ही भागीदारी फिनटेक क्षेत्रातील भारताचे वाढते वर्चस्व सिद्ध करते.
शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि पशुधनाला होणारा थेट फायदा (Digital India In NewZealand)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केेले की, भारत आणि न्यूझीलंड आता केवळ पारंपरिक संबंधांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. दोन्ही देसांनी आपल्या संबंधांचा दर्जा वाढवून ते ‘ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ म्हणजेच सामरिक भागिदारीच्या पातळीवर नेले आहेत. ही भागीदारी अधिक व्यावहारिक आणि मजबूत करण्यासाठी ‘रोडमॅप 2030’ जाहीर कऱण्यात आला आहे.
फिनटेक क्षेत्रात युपीआय जोडणीसोबतच कृषी, दुग्धव्यवसाय आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रांमध्ये सहकार्याची एक मजबूत चौकट स्थापित कऱण्यात आली आहे. न्यूझीलंडचे दुग्धव्यवसायातील जागतिक कौशल्य आणि भारताची मोठी बाजारपेठ एकत्र आल्यामुळे दोन्ही देशांमधील शेकडो शेतकरी आणि पशुपालकांना याचा थेट आर्थिक फायदा मोठी बाजारपेठ एकत्र असल्यामुळे दोन्ही देशांतील शेकडो शेतकरी आणि पशुपालकांना याचा थेट आर्थिक फायदा होणार आहे. दोन्ही देश भविष्यातही आपले तांत्रिक ज्ञान एकमेकांना देत राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जगातील ‘या’ देशात वापरले जातेय भारतीय UPI (UPI Digital India In NewZealand)
भारताची युपीआय प्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत वेगाने स्विकारली जात आहे. न्यूझीलंडपूर्वी जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये ही डिजीटल सेवा यशस्वीपणे कार्यरत आहे. सध्या नेपाळ, भूतान, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती (UAE), मॉरिशस आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये भारतीय नागरिक अगदी सहजपणे युपीआयद्वारे व्यवहार करत आहेत. याव्यतिरिक्त फ्रान्स, कतार, कंबोडिया आणि ग्रीसमधील निवडक प्रमुख पर्यटन स्थळांवर ही सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता या यादीत न्यूझीलंडचे नाव जोडले गेल्यामुळे जागतिक स्तरावर प्रवास कऱणाऱ्या भारतीय पर्यटकांना पैशांचे व्यवहार कऱणे कमालीचे सोपे होणार आहे.
भारतीय विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संधी आणि विद्यापीठांना आमंत्रण
उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांकरिता न्यूझीलंड हे नेहमीच जगातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि आवडते ठिकाण राहिले आहे. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील शैक्षणिक संबंध अधिक दृढ कऱण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी न्यूझीलंडमधील नामांकित विद्यापीठांना भारतात येऊन आपले कॅम्पस उघडण्याचे अधिकृत आमंत्रण दिले आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार. तसेच या दौऱ्यात स्वाक्षरी झालेला सांस्कृतिक सहकार्य करार दोन्ही देशांच्या कला, वारसा आणि सर्जनशील उद्योगांना मोठी चालना देईल.
Held extensive and fruitful talks with PM Luxon in Auckland this morning. His own visit to India last year energised our bilateral partnership and my visit today, the first by an Indian Prime Minister in 4 decades, has added further momentum to the India-New Zealand friendship.… pic.twitter.com/W8bpOfAeeE
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2026
न्यूझीलंडमधील स्थायिक भारतीयांचे मानले आभार (Digital India In NewZealand)
पंतप्रधान मोदींनी न्युझीलंडच्या प्रगतीमध्ये तिथल्या भारतीय समुदायाच्या अमूल्य योगदानाचा विशेष गौरव केला. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील मजबूत ‘जन-जन संबंध’ हीच आपल्या मैत्रीची सर्वात मोठी ताकद आहे. न्यूझीलंडच्या स्वतःला स्थापित कऱण्यासाठी आणि भारताचे नाव उंचावण्यासाठी तिथल्या भारतीयांनी जे कठोर परिश्रम घेतले, त्याबद्दल पंतप्रधानांनी जाहीर आभार मानले. आता न्यूझीलंडच्या अधिकृत संयुक्त निवेदनातही भारतीय समुदायाला तिथल्या वैविध्यपूर्ण समाजाचा एक अविभाज्य भाग आणि दोन्ही देशांना जोडणारा ‘जिवंत दुवा’ म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे.