Vietnam Boat Accidentव्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना, 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी नाव समुद्रात बुडाली, 15 जणांचा मृत्यू .

Vietnam Boat Accident : व्हिएतनाममधील समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली आहे. या बोटीमधून 32 भारतीय पर्यटक प्रवास करत होते. समुद्रामध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

व्हिएतनाम : 11-07-2026

व्हिएतनाममधील (Vietnam Boat Accident) समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली आहे. या बोटीमधून 32 भारतीय पर्यटक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच समुद्रामध्ये शोधमोहीम सुरू कऱण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

32 भारतीय पर्यटक धोक्यात (Vietnam Boat Accident)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जात असलेली बोट नियंत्रण सुटून व्हिएतनाममधील प्रसिद्ध फु क्वोक बेटाजवळ बुडाली. बोट बुडाव्यानंतर त्यातील पर्यटकांनी मदतीसाठी आरडा ओरडा कऱण्यास सुरूवात केली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तसेच प्रशासनने तातडीने मदत कार्य सुरू केले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त बोटीमधून एकूण 36 लोक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 21 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. तर या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय दूतवास ॲक्शन मोडवर (Vietnam Boat Accident)

या भीषण दुर्घटनेच्या गांभिर्याचा विचार करून भारतीय दुतवासाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच या दुर्घटनेमधील पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी आणि दुर्घटनास्थळावरील घडामोडींची माहिती देण्यासाठी हो ची मिन्ह आणि हनोई येथे विशेष आप्तकालीन कंट्रोल रुम स्थापना केली आहे.

व्हिएतनाममधील भारतीय दूतवासाने सोशल मीडियावर पोस्ट करत या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. भारतीय दुतावासाने लिहिले की, व्हिएतनामच्या फू क्वोक बेटाजवळ काही तासांपूर्वी झालेल्या अत्यंत दुःखद दुर्घटनेत भारतीय पर्यटकांना घेऊन जात असेलेली एक नाव बुडाली. या दुर्घटनेबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे. तसेच दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून शोध आणि बचाव अभियान राबवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!