Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकऱणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. सिया गोयलनंतर आता आरोपी चेतन चौधरीचे लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएशन कऱण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. सीसीटीव्हीतील संशयित व्यक्ती चेतनच असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी गेट ॲनॅलिसिस कऱण्यात येणार आहे. पावसामुळे तपास प्रक्रियेत अडथळे येत आहेत.
पुणे : 01-07-2026
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकऱणाचा (Ketan Agrawal Murder Case) तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकऱणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला लोहगड किल्ला परिसरात नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ करण्यात आले. आता चेतन चौधरी सोबतदेखील ‘सीन रिक्रिएशन’ करण्याची तयाकी पोलिसांनी केली आहे. मात्र, लोणावळा परिसरात होणारा मुसळधार पाऊस या प्रक्रियेत मोठा अडसर ठरत आहे.
Table of Contents
गेट ॲनॅलिसिसमधून होऊ शकतो उलगडा (Ketan Agrawal Murder Case)
लोहगड किल्ल्यावर हत्येच्या दिवशी सीसीटिव्हीमध्ये कैद झालेल्या संशयास्पद व्यक्तीचा उलगडा कऱण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी सुरू केली आहे. या व्यक्तीची ओळख आरोपी चेतन चौधरी असल्याचा पोलिसांचा दावा असून, तो सिद्ध करण्यासाठी आता त्याचे ‘गेट ॲनिलिसिस’ करण्यात येणार आहे. या तांत्रिक तपासातून हत्याकांडातील महत्त्वाचा पुरावा समोर येण्याची शक्यता आहे.
लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही व्हिडिओत दिसलेली ती संशयास्पद व्यक्ती ज्या पद्धतीने आणि ज्या मार्गावरून चालत किंवा पळत गेली होती, अगदी त्याच मार्गावरून चेतनला चालवले जाईल.
पोलिसांसमोरील आव्हान (Ketan Agrawal Murder Case)
गेट ॲनॅलिसिस पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पावसात पार पडली, तर चेतनच्या चालण्याची अचूक पद्धत आणि सिसीटिव्ही फुटेजमधील चालण्याची पद्धत मॅच करणे फॉरेन्सिक टीमसाठी कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस पावसाची उघडीप मिळण्याची वाट पहात आहेत.
75 मिनिटांत काय घडले आहे ? (Ketan Agrawal Murder Case)
सियाला जेव्हा सीन रिक्रिएशन कऱण्यासाठी नेण्यात आले तेल्हा तिने हत्येचे ठिकाण दाखवले होते. आता ते हत्येचे ठिकाण आणि चेतन दाखवत असलेले ठिकाण एकच आहे का ? याची पडताळणी केली जाईल. हत्येच्या दिवशीच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या 75 मिनिटात नक्की काय घडले ? याच्यावर भर देण्यात येणार आहे. चेतन चौधरीचे सिन रिक्रिएशन 3 जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शॉपिंगच्या बहाण्याने सियाने केतनकडून उकळले पैसे; एक कोटी घेऊन दिले केतनला (Ketan Agrawal Murder Case)
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकऱणात दररोज काहीन काही धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जूनला सियाने केतनला लोहगडावरून ढकलून दिले आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने तिला या हत्येत मदत केली. सिया गोयलने केतनकडून एक कोटी रुपये घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे. केतनने पैसे दिल्यानंतर तिने ते पैसे प्रियकर चेतनला दिले होते. पोलिस सूत्रांनुसार, चेतनने सियाकडून घेतलेले हे पैसे त्याच्या व्यवसायात गुंतवले. केतनच्या तुलनेत चेतनची परिस्थिती चांगली नव्हती. चेतनने सियाला हे सांगितले होते की, आपल्याला लग्न करायचे असेल तर किमान तीन वर्षे तरी हातात हवी आहेत.