Muskan Soni Ketan Agarwal Murderमृत केतन अग्रवालची थट्टा करणाऱ्या एका डॉक्टरवर कारवाई ! आक्षेपार्ह विधान कऱणे महिलेला भोवणार

Muskan Soni Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सोशल मीडियावर केलेल्या असंवेदनशील टिप्पणीमुले डॉ. मुस्कान सोनी हिला ‘ऑल इंडिया डेंटल स्टुडंटस ॲंड सर्जन्स असोसिएशनने’ ने (AIDSA) 5 वर्षांसाठी निलंबित केले आहे. केतनच्या दुःखद मृत्यूची थट्टा केल्याने समाजात संताप व्यक्त केला जात आहे. संस्थेने हे नैतिक मूल्यांचा भंग मानत कठोर कारवाई केली.

पुणे : 01-07-2026

सध्या देशभरात केतन अग्रवाल हत्येच्या (Muskan Soni Ketan Agarwal Murder) या एकाच प्रकऱणाची चर्चा सुरू आहे. एकीकडे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तर दुसरीकडे जनमानसात आणि सोशलमीडियावर चर्चांवर चर्चा केल्या जात आहेत.

मात्र काही लोकं केतन अग्रवाल याच्या दु्दैवी मृत्यूवर काहीही बोलून, त्याचा अपमान करत आहेत. अशीच एक डॉक्टर महिला तिच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाविषयी बोलत होती. तिचे हे बोलणे सोशलमीडियावर चांगलेच व्हायरल झाले. तिच्या या चुकिच्या विधानांमुळे तिला आता चांगलीच शिक्षा घडलेली आहे.

केतनच्या दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद मृत्यूची सोशल मीडियावर थट्टा करणारी डेंटीस्ट डॉ. मुस्कान सोनी हिला तिच्या चुकीची शिक्षा मिळणार आहे. कारण ‘ऑल इंडिया डेंटल स्टुडंटस अँड सर्जन्स असोसिएशन ‘ (AIDSA) ने त्वरित कारवाई करत डॉ. मुस्कान सोनी हिला संघटनेतून पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे.

मध्य प्रदेशातील डेंटीस्ट आणि असोसिएशनची खजिनदार असलेली डॉ. मुस्कान सोनी हिने, केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर, तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटवर अत्यंत आक्षेपार्ह ‘स्टोरी’ पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये तिने केतनच्या भीषण मृत्यूबाबत संवेदनशील टिप्पणी केली आणि हसण्याचे इमोजी वापरून या घटनेची थट्टा देखील केली. ” तुम्ही जर खोटं बोलाल तर मरालच ना” असंही तिने म्हटलं आहे. यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ही पोस्ट पहाता पहाता व्हायरल झाली आणि अनेकांनी डॉ. मुस्कान हिच्याबद्दल नाराजी दर्शवत संताप व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रासारख्या संवेदनशील व्यवसायातील व्यक्तीने, एखाद्या हत्येबाबत इतका क्रूर विनोद केल्याची ही घटना “ऑल अंडिया डेंटल स्टुडंटस ॲंड स्टुडंट्स ॲंड असोसिएशनने’ने अत्यंत गांभिर्याने घेतली आहे.

ही पोस्ट किंवा हे कृत्य म्हणजे केवळ घोर बेशिस्त नव्हे तर संस्थेची नैतिक मूल्ये व प्रतिष्ठा यांचा भंग कऱणारे आणि डॉक्टरांकडून समाजाप्रती अपेक्षित असेलल्या संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारे कृत्य असल्याचे मत असोसिएशनने व्यक्त केले आहे.

AIDSA चा कठोर हुकूम : सर्व हक्क रद्द  (Muskan Soni Ketan Agarwal Murder)

संस्थेने मुस्कानवर निलंबनाची कारवाई केली आहे. संस्थेने जाहीर केलेल्या अधिकृत निलंबन आदेशानुसार, या लज्जास्पद कृत्यामुळे डॉ.मुस्कान सोनी हिला पुढील पाच वर्षांसाठी पूर्णपणे ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. या कालावधीत ती संस्थेतील कोणतेही अधिकृत पद भूषविण्यासाठी,कोअर कमिटीत काम करण्यासाठी किंवा संस्थेचे सामान्य सदस्यत्व राखण्यास पात्र नसेल. निलंबनाच्या काळात तिला, संस्थेच्या कोणत्याही अधिकृत उपक्रमांमध्ये, परिसंवादामध्ये किंवा बैठकांमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळणार नाही. तसेच पुढली 5 वर्ष तिला संस्थेअंतर्गत होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभेही राहता येणार नाही.

केतन अग्रवाल हत्या प्रकरण काय आहे ?( Muskan Soni Ketan Agarwal Murder)

पुण्यातील नामांकित बिझनेसमन विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगडावरून खाली कोसळून मृत्यू झाला. आधी सर्वांना हा अपघात वाटत होता, मात्र केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच कट रचून त्याला खाली ढकलून त्याची हत्या केली अशी माहिती नंतर समोर आली. दोन्ही आरोपींनी केतनला किल्ल्यातील एका उंच ठिकाणी नेऊन, तिथून त्याला खोल दरीत ढकलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!