Tanushree Kadu Hockeyज्युनिअर भारतीय हॉकी संघात महाराष्ट्राच्या तनुश्री कडूची निवड, थेट इंग्लडमध्ये खेळणार तनू

Tanushree Kadu Hockey : महाराष्ट्राच्या खेळ विभागासाठी एक आनंदासाठी बातमी आहे. यवतमाळची तनूश्री कडू हीची भारतीय ज्युनिअर हॉकी संघात निवड झाली आहे. शाळेत असताना हॉकी प्रशिक्षक शाहिद सय्यद यांनी तनुश्रीच्या पायांमधील वेग आणि हातांमधील स्कील ओळखले होते. त्यांनीच तिच्यातील कौशल्याला पहिली योग्य  दिशा दिली.

पुणे : 27-06-2026

यवतमाळच्या लोहारा भागातील एका सामान्य कुटुंबातील एक मुलगी इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 20 वर्षीय तनुश्री दिनेश (Tanushree Kadu Hockey) कडू या पोरीने थेट भारतीय कनिष्ठ (ज्युनिएर) महिला हॉकी संघात स्थान मिळवेल आहे. आगामी 5 ते 14 जुलै दरम्यान इंग्लडमध्ये होणाऱ्या अंडर-21 आंतरराष्ट्रीय ह़ॉकी स्पर्धेत ती भारताची ‘मिडफील्डर’ म्हणून मैदानात उतरणार आहे. तनुश्रीची ही गरूडझेप केवळ तीची एकटीची नसून, तिच्या कुटुंबाने हलाखीच्या परिस्थितीतही दिलेल्या खंबीर साथीची आहे.

असा घडला तनुश्रीचा प्रवास (Tanushree Kadu Hockey)

तनुश्रीचा हा प्रवास यवतमाळ येथून सुरू झालेला आहे. तिच्या प्रवासात अनेक अडथळे आले. मात्र तिने जिद्दीने हॉकीबद्दल असलेले प्रेम आणि खेळाप्रती असलेली जिद्द यांच्या जोरावर तिने भारतीय अंडर-20 टीमपर्यंत प्रवास गाठला. यावेळी तिचे वडील दिनेश कडू यांनी सांगितले की, “आम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच मानला नाही. मोठी मुलगी परभणीला वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर धाकट्या तनूला खेळात मज्जाव केला नाही. तिच्या डोळ्यात हॉकीचे एक वेगळेच वेड होते. पैसा नसताना तिचे स्वप्न तुटू नये म्हणून आम्ही रक्ताचे पाणी केले. आज तिने आमच्या कष्टाचे चीज केले.” तर आईला मुलीच्या यशाबद्दल विचारले असता त्यांचे अश्रू अनावर झाले.

लोहार ते लंडन : तनुश्रीची झेप (Tanushree Kadu Hockey)

शाळेत असताना हॉकी प्रशिक्षक शाहिद सय्यद यांनी तनुश्रीच्या पायांमधील वेग आणि हातांमधील स्कील ओळखले. त्यांनीच तिच्यातील कौशल्याला पहिली योग्य दिशा दिली. तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथील अभयंकर कन्या शाळा येथे झाले. त्यानंतर 2022 मध्ये तिची पुण्यातील ‘क्रिडा प्रबोधिनी’ त निवड झाली.

येथे तिने कॉमर्स या विषयात उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना 22-23 या वर्षी 12 वी उत्तीर्ण केली. तसेच त्यानंतर पुढील शिक्षण एसएनडीटी (SNDT) येथे घेतले. 2024 मध्ये भारतीय क्रिडा प्राधिकरणाने (SAI) तिच्यातील अफाट गुणवत्ता पाहून मुंबईच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात (NCOE) तिची निवड केली. यानंतरच तिच्यासाठी भारतीय संघाची दारे तिच्यासाठी खुली झाली आहेत.

हा देश माझा आहे आणि कामगिरी 100 टक्के असले ! (Tanushree Kadu Hockey)

” माझ्या यवतमाळपासून ते पुणे, मुंबई आणि बेंगळुरपर्यंत ज्या ज्या गुरूजींनी, प्रशिक्षकांनी आणि हितचिंतकांनी मला अंगाखांद्यावर खेळवून मार्गर्दशन केले, हे यश त्या प्रत्येकाचे आहे. इंग्लडच्या भूमीवर भारतीय जर्सी घालून देशाचा तिरंगा उंच करण्यासाठी मी माझे 100 टक्के योगदान देईन. – तनुश्री कडू, नवनियुक्त आंतरराष्ट्रीय हॉकीपटू, भारत

कधी होणार भारतीय संघ इंग्लडला रवाना (Tanushree Kadu Hockey)

भारतीय हॉकी संघाने 5 ते 14 जुलै या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या (UK) दौऱ्यावर जाणाऱ्या 24 सदस्य भारतीय कनिष्ठ महिला संघाची घोषणा केली आहे. नवीन प्रशिक्षक टिम व्हाईट यांच्या मार्गदर्शनाखाली, हा संघ ‘ज्युनिअर आशिया कप’ सह आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लडमध्ये सात सामने खेळणार आहे. याकरिता सध्या बेंगळूरमध्ये संघाचा सराव सुरू आहे. 3 तारखेला हा संघ इंग्लडसाठी रवाना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!