Passport Fee Hikeपासपोर्ट झाला महाग ! केंद्र सरकारने वाढवले अर्ज शुल्क, 1 जुलैपासून लागू होणार नवे दर

Passport Fee Hike : केंद्र सरकारने 1, जुलै 2026 पासून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ जाहीर केली आहे. या नव्या नियमांमुळे पासपोर्टशी संबंधित इतर सेवांच्या शुल्कातही वाढ होणार आहे.

दिल्ली : 26-06-2026 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच भारतीय पासपोर्ट हे भारताचे नागरिकत्व सिद्ध कऱणारे दस्ताऐवज नसल्याचे स्पष्ट केले आहे. या विधानामुळे सध्या सर्वत्र वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने 1 जुलै,2026 पासून पासपोर्ट शुल्कात (Passport Fee Hike) मोठी वाढ जाहीर केली आहे. आता नव्या निर्णयानुसार, पासपोर्टसाठी 2 हजार 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे पासपोर्टने नागरिकत्व सिद्ध होत होत नसेल, तर मग एवढे पैसे कशासाठी असा प्रश्न लोक उपस्थित होत आहेत.

काय आहेत नवे नियम ? (Passport Fee Hike)

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सुधारणा नियम 2026 अंतर्गत अधिकृत सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, 1 जुलैपासून पासपोर्ट शुल्कात वाढ होणार आहे.

नवीन नियमानुसार, नवीन पासपोर्टसाठी 2 हजार 500 रुपये मोजावे लागतील, तर तत्काळ पासपोर्टसाठी 5 हजार रुपये आकारले जाणार आहेत.

तर 60 पानांच्या पासपोर्टसाठी साध्या श्रेणीत 3,500 रुपये आणि तत्काळ योजनेत 6,000 रुपये मोजावे लागणार आहेत.

18 वर्षांखालील मुलांसाठी नवी किंवा 36 पानांच्या पासपोर्ट नुतनीकरणासाठी 1,750 शुल्क आकारले जाईल, तर तत्काळसाठी 4,250 रुपये आकारले जातील. यापूर्वी ही फी केवळ 1,000 रुपये होती.

नव्या नियमांनुसार, 8 वर्षाखालील मुले आणि 60 वर्षांखालील जेष्ठ्य नागरिकांसाठी नव्या पासपोर्टसाठी 10 % सवलत दिली जाणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुधारित शुल्क फी 1 जुलै 2026 पासूल लागू होणार आहे. यामुळे 1 जुलै रोजी किंवा त्यानंतर सादर करण्यात आलेल्या सर्व अर्जांवर नवीन नियमांनुसार, शुल्क आकारले जाईल. पासपोर्ट कायदा 1967 च्या कलम 24 अन्वये अधिसुचनेद्वारे विविध प्रवास दस्तऐवज आणि पासपोर्ट संबंधित सुधारणा करण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने जवळपास 14 वर्षात पहिल्यांदाच पासपोर्ट शुल्कात वाढ केली आहे.

पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट फीमध्ये वाढ (Passport Fee Hike)

याशिवाय पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सरेंडर सर्टिफिकेटच्या फीमध्ये 500 रुपयांवरून 750 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

30 जून पूर्वी अर्ज कऱणे ठरले फायदेशीर (Passport Fee Hike)

जर तुम्हाला पासपोर्ट फी वाचवायची असेल तर जुन्या दराने पासपोर्ट काढू शकता. यासाठी 30 जून पूर्वी अर्ज करणे फायद्याचे ठरेल. 30 जून नंतर अर्ज केल्यास नवीन नियमांनुसार शुल्क आकारले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!