US India Tradeट्रम्पचे 'टॅरिफ'धोरण धोक्यात ! अमेरिकन वाणिज्य सचिव तातडीने दिल्लीत दाखल, पियुष गोयल यांच्याशी चर्चा.

US India Trade : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांनी लावलेले टॅरिफ यांचीच चर्चा सुरू आहे. जागतिक दरांबाबत आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना अलिकडेच मोठा धक्का दिला. दरम्यान, अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक अचानक भारत दौऱ्यावर आले आहेत.

दिल्ली : 27-02-2026 

जागतिक व्यापाराच्या रंगमंचावर सध्या सर्वत्र डोनाल्ड ट्रम्प यांचा डंका सुरू आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमकपणे लादलेल्या ‘जागतिक करा’ला (US India Trade) तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून मोठा धक्का दिला आहे, तर दुसरीकडे या निकालानंतर काही दिवसांतच अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, भारत आणि अमेरिका यांच्यातील भविष्यातील व्यापारी गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहे.

पियुष गोयल आणि लुटनिक यांच्यात चर्चा  (US India Trade)

गुरूवारी ( 26 फेब्रुवारी ) हॉवर्ड लुटनिक यांनी भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. ही केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर याला ‘उत्पादक चर्चा’ असे संबोधले जात आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत लिहिले की, ” दोन्ही देशांसाठी सहकार्याची अनेक क्षेत्रे उघडली आहेत.” गोयल यांनीही व्यापार आणि आर्थिक भागीदारी वाढवण्यावर भर दिल्याचे नमूद केलेय अमेरिकेच्या वाणिज्य विभागानेही या वृत्ताला दुजोरी दिला असून, दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ ‘ धोरणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका (US India Trade)

ट्रम्प प्रशासनासाठी गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठी बातमी म्हणजे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाता निकाल. 20 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने ‘आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्यांतर्गत’ ( IEEPA) ट्रम्प यांनी लादेलेली जागितक कर अवैध घोषित केला. ट्रम्प यांनी 1974 च्या व्यापार कायद्याच्या कलम 122 चा वापर सर्व व्यापारी भागीदारांवर 10% जागतिक कर लादला होता आणि तो 15 % पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, न्यायालयाने राष्ट्राध्यक्षांच्या या अधिकाराला लगाम घातला आहे. हा निकाल भारतासारख्या व्यापारी भागीदारांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

दिल्लीनंतर लुटनिक थेट जोधपूरला रवाना (US India Trade)

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतल्यानंतर हॉवर्ड लुटनिक थेट राजस्थानच्या जोधपूरकडे रवाना झाले. त्यांच्या या प्रवासामागे एक वैयक्तिक कारणही आहे. जोधपूरमध्ये सध्या ‘टेक एक्झुक्युटिव्ह’ निकेश अरोरा यांची मुलगी आयशा अरोरा आणि प्रसिद्ध आईस हॉकी स्टार जॅक ह्यूजेस यांचा शाही विवाह सोहळा पार पडत आहे. या हाय-प्रोफाइल लग्नाला हजेरी लावण्यासाठी लुटनिक जोधपुरला पोहोचले आहेत. मात्र, त्यांच्या दिल्लीतील घाईघाईच्या भेटीमुळे व्यापारी समुदायात ‘काहीतरी मोठे घडणार’ असल्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीत.

भारत-अमेरिका व्यापार संबंधाचे भवितव्य (US India Trade)

सध्या अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ट्रम्प यांच्या 10% जागतिक कराच्या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अमेरिकेन प्रशासन भारतासोबत ‘टॅरिफ’ ऐवजी सहकार्य या तत्त्वावर काम करण्याची शक्यता आहे. लुटनिक आणि गोयल यांच्यातील चर्चेत तंत्रज्ञान, संरक्षण आणि पुरवठा साखळी या विषयांवर अधिक भर देण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!