Virat Kohali : IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध RCB च्या विजयानंतर, स्टार फलंदाज विराट कोहलीने मंगळवारी दिल्लीतील DPS, RK पुरम येथे ‘वेस्ट दिल्ली क्रिकेट ॲकॅडमी’च्या एका शाखेचे उद्धाटन केले.
दिल्ली : 28-04-2026
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली (Virat Kohali )याने मंगळवारी नवी दिल्लीतील ‘डीपीएस आरके पुरम’ येथे, आपले बालपणीचा प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या क्रिकेट अकादमीच्या नवीन शाखेचे उद्धाटन केले. या उद्धाटन समारंभाला ‘दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन’चे (DDCA) अध्यक्ष रोहन जेटली हे देखील उपस्थित होते. विराट कोहलीने आपल्या क्रेकेट कारकिर्दीची सुरूवात राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीच्या केली होती.
उद्धाटन प्रसंगी मुलांना दिला यशाचा ‘विराट’ मंत्र (Virat Kohali )
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विराट कोहली म्हणाला, ” मला येथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. मला शाळांमध्ये बोलण्याची सवय नाही, त्यामुळे मला हे थोडे विचित्र वाटत आहे मुख्यतः कारण मी क्रिकेटसाठी शाळेचे वातावरण खूप वर्षांपूर्वीच मागे सोडले होते; आणि नेमक्या याच विषयावर मला आज बोलायचे आहे. मला शाळेच्या वातावरणाची पूर्ण जाणीव आहे; तुम्ही सर्व मुले सध्या ज्या प्रक्रियेतून आणि टप्प्यातून जात आहात, त्याच प्रक्रियेतून आणि टप्प्यातून मी देखील गेलो आहे. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगायचे तर, मी तुमच्याशी फक्त एवढेच शेअर करू शकतो की, अगदी लहान वयातच माझे लक्ष आणि माझ्या प्राथमिकता कशा बदलल्या होत्या”.
कोहलीचा कानमंत्र (Virat Kohali )
कोहलीने पुढे सांगितले, ” मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की, शाळा हे असे ठिकाण आहे तिथे तुम्ही काहीतरी शिकण्यालाठी येता, जिथे तुमची वाढ होते आणि जिथे तुम्ही अधिक चांगले माणूस म्हणून घडता”. एखाद्याच्या आयुष्यात शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची असते यावर भर देत, कोहलीने विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी आपल्या शिक्षकांचा अत्यंत आदर आणि सन्मान करावा. त्याने नमूद केले की, शिक्षक आपल्या स्वतःच्या आयुष्यातील काही भाग आपल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित करताता; त्यांना ज्या आदराची, लक्ष देण्याची आणि सन्मानाची गरज आहे, तो त्यांना देणे अत्यंत आवश्यक आहे.
Virat Kohli Giving A Speech At The Inauguration Ceremony. 👑 pic.twitter.com/oZj3VirCmi
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) April 28, 2026
क्रिकेटप्रती असलेली आपली सुरूवातीची कटीबद्धता आणि आपल्या ध्येयांबद्दल असलेली स्पष्टता याविषयी बोलताना कोहली म्हणाला, ” मी अगदी लहान वयातच खेळाचे क्षेत्र निवडले होते; पण तो निर्णय मी पूर्णपणे मनापासून आणि प्रामाणिकपणे घेतला होता. मला क्रिकेटमध्येच करिअर करायचे आहे, याबद्दल माझी पूर्ण खात्री पटली होती. मला असे वाटले की, स्वतःशी, माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या शिक्षकांशी पूर्णपणे प्रमाणिक राहणे अत्यंत गरजेचे आहे; जेणेकरून मला त्यांना स्पष्टपणे सांगता येईल की, मला नेमक्या याच मार्गावरून पुढे जायचे आहे.”
भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराने विद्यार्थ्याना असा सल्ला दिला की, त्यांनी आपल्या स्वप्नांशी प्रमाणिक रहावे आणि ती पूर्ण करण्यासाठी अढळ निष्ठेने प्रयत्न करावेत. या ॲकॅडमीशी निगडीत आपल्या आठवणींना उजाळा देताना कोहली म्हणाला. ” हा माझ्या आयुष्याचा आणि बालपणाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. मी वयाच्या आठव्या वर्षी इथे सराव करायला सुरूवात केली होती आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, तेव्हा आजही मी या ॲकॅडमीला भेट देतो. माझ्या बालपणाचा हा एक मोठा हिस्सा आहे. त्यामुळे मला आशा आहे की, इथे क्रिकेट शिकण्यासाठी येणारी सर्व मुले याचे महत्त्व समजून घेतील आणि या ॲकॅडमीतून नक्कीच काहीतरी मोलाचे शिकतील. तसेच, शाळा आणि येथील क्रिकेट व्यवस्थापनासाठीही हा अनुभव अतिशय सुखद ठरेल, अशीही मला आशा आहे. म्हणूनच मी सर्वांना शुभेच्छा देतो”.
#WATCH | Delhi: Cricket star Virat Kohli inaugurated a branch of West Delhi Cricket Academy at DPS RK Puram. His childhood coach, Rajkumar Sharma was also with him. pic.twitter.com/gQumDN5om8
— ANI (@ANI) April 28, 2026