Jharkhand Student Protestझारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलनाने घेतलेय तीव्र वळण, बॅरिकेडस् तोडून विधानसभेजवळ पोहोचले विद्यार्थी

Jharkhand Student Protest : झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाले. विधानसभा घेरावासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांचे तब्बल आठ बॅरिकेडस तोडून विधानसभा दिशेने आगेकूच केली. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला.

झारखंड : 10-08-2026

झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील (Jharkhand Student Protest ) कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारी (10 ऑगस्ट 2026) अधिक आक्रमक झाले. विधानसभा घेरावासाठी राजधानी रांचीमध्ये जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी पोलिासांनी उभारलेल्या एकामागून एक बॅरिकेडस पार केले. अखेर विद्यार्थ्यांनी आठवे बॅरिकेडही तोडून विधानसङा परिसराच्या दिशेने आगेकूच केली.

आठ बॅरिकेडस तोडून विद्यार्थ्यांची आगेकूच (Jharkhand Student Protest )

विद्यार्थ्यांना विधानसभा परिसरापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली होती. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांनी एकामागून एक बॅरिकेडस पार करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जुन्या विधानसभा परिसराजवळ विद्यार्थ्यानी पहिला बॅरिकेड तोडल्यानंतर त्यांची आगेकूच सुरूच राहिली.

आठवे बॅरिकेडस पार केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गट वेगवेगळ्या दिशेने पुढे सरकले. काही विद्यार्थी विधानसभा दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पोलिसांकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वॉटर कॅननचा वापर (Jharkhand Student Protest )

आंदोलनकांना रोखण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला. मात्र पाण्याचा जोरदार फवाऱ्यांनंतरही अनेक विद्यार्थी मागे हटले नाहीत. उलट काही विद्यार्थी वॉटर कॅननच्या पाण्यात उभे राहून घोषणाबाजी करताना आणि झोके घेताना दिसले. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. पोलिस आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना पुढे न जाण्याचे तसेच शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन कऱण्यात येत आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही आंदोलकांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

24 जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी रांचीत दाखल (Jharkhand Student Protest )

या आंदोलनासाठी झारखंडच्या 24 जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा, पोस्टर्स आणि बॅनर्स असून ते विधानसभा दिशेने मोर्चा करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 14 व्या JPSC पूर्व परिक्षेसह वादग्रस्त परीक्षा रद्द करणे, भरती प्रक्रियेत सुधारणा करणे आणि संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करणे यांचा समावेश आहे.

सरकारसोबतची चर्चा निष्फळ (Jharkhand Student Protest )

रविवारी सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये चर्चोती तिसरी फेरी झाली होती. मात्र ही बैठकही निष्फळ ठरली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विधानसभा घेरावाचा निर्णय जाहीर केला. सोमवारी सकाळपासूनच रांचीच्या विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून विद्यार्थी बस, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून रांचीमध्ये पोहोचले. अनेक विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री जयपाल सिंह मुंडा स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात मुक्काम केला.

भाजपचेही मुख्यमंत्री निवासासमोर आंदोलन (Jharkhand Student Protest )

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान भाजपनेही मुख्यमंत्री निवासाच्या घेरावाचे आंदोलन केले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप आमदारांची बैठक झाल्यानंतर आमदार आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासाकडे रवाना झाले. सुमारे सकाळी 9:45 वाजता झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बाबूलाल मरांडी, भाजप प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

रांचीत सुरक्षा व्यवस्था कडक (Jharkhand Student Protest )

विद्यार्थ्यांचा विधानसभा घेराव आणि भाजपच्या मुख्यमंत्री निवास आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. विधानसभा आणि मुख्यमंत्री निवासाच्या आसपास मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाचा प्रयत्न विद्यार्थ्यांना विधानसभा परिसरापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचा आहे. मात्र विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असून बॅरिकेडस पार करत सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे रांचीमध्ये पोलिस आणि आंदोकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!