Tribal Students Hunger Strike Manjariआदिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, मांजरी येथील आंदोलनात विद्यार्थ्यांचा संताप .

Tribal Students Hunger Strike Manjari : गेल्या 12 दिवासांपासून विविध मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यातील एका आंदोलकांची प्रकृती खालावल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला. आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आता सरकार हस्तक्षेप कऱणार का ? हा प्रश्न आहे.

मांजरी : 25-08-2026

आदिवासी विद्यार्थी (Tribal Students Hunger Strike Manjari) आक्रमक झाले आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा संताप आज दिसून आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आदिवासी संताप उसळला. काहींनी माध्यमांसमोर हात जोडले. कुणाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूधारा सुरू झाल्या. आंदोलनकर्त्यांना काहीएक झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. राहुल धनवे या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी चिंता व्यक्त केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या यकृतावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांच्या संतत्प प्रतिक्रिया (Tribal Students Hunger Strike Manjari)

विद्यार्थ्यांनी गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सरकार दखल देत नसल्याने चिंता व्यक्त केली आहे. सरकारच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांनी सडकून टीका केली आहे. काहींनी हात जोडले. तर काहींना अश्रु अनावर झाले. काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे, असा निर्धार व्यक्त केला.

आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे. तर आंदोलकांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. नुकताच व्हिडिओ कॉलवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांशी संवाद साधला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे (Tribal Students Hunger Strike Manjari)

व्हिडिओ कॉलवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करत असलेल्या मुलींशी चर्चा केली. पवार साहेब, मुख्यमंत्री असताना त्यांनी ते बजेट दिलेले होते. त्याला कोणी हात लावू शकत नाही. विद्यार्थ्यांची काळजी आहे आणि सरकारशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या ? (Tribal Students Hunger Strike Manjari)

  • आदिवासी वसतिगृहाबाबत यावर्षी घेतलेला निर्णय रद्द करावा.
  • 2011 मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
  • शिल्लक 12 हजार 500 पदांची भरती करावी.
  • विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करावी.
  • प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
  • जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी.
  • शहरांच्या मध्यमवर्ती भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!