Ketan Agrawal Caseकेतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा व्हिडिओ व्हायरल, महिनाभरानंतर केला घात

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकऱणात रोज नव नवे खुलासे होत आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये सिया गोयल केतनचे ” He is Caring And Kind” असे म्हणत कौतुक करताना दिसत आहे.

पुणे : 20-07-2026 

राज्यभरात ज्या गुन्ह्याचीच चर्चा सध्या सुरू आहे तो म्हणजे केतन अग्रवाल (Ketan Agrawal Case) खुन खटला. पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकऱणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकऱणात एक जुना व्हिडिओ समोर आला असून, त्यात मुख्य आरोपी सिया गोयल साखरपुड्याच्या कार्यक्रमात केतनबद्दल “He is caring And Kind” असे म्हणत त्याच्या स्वभावाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. एकीकडे सिया आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ कऱण्यात आली असताना, दुसरीकडे समोर आलेल्या या व्हिडिओमुळे या हत्याकांडाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

डिसेंबरमध्ये होणार होता विवाह (Ketan Agrawal Case)

सिया अग्रवाल आणि केतन चौधरी यांचा विवाह डिसेंबरमध्ये होणार होता, त्याआधीच सियाने आपल्या प्रियकराच्या मदतीने लोहगडावरून केतनला ढकलून दिले. प्रेमप्रकऱणामुळे हे लग्न सियाला मान्य नव्हते. त्यामुळेच तिने केतनची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या हत्या प्रकऱणाला 18 जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून 400 फूट दरीत ढकलून हत्या केली.

सुरूवातीला हा अपघात असल्याचे भासवले गेले, मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यावर हे पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकऱणात वडगाव न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. केतनच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी केली होती. मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पाडला होता. या साखरपुड्यातील एक नवीन व्हिडिओ समरो आला आहे.

व्हिडिओत काय आहे ? (Ketan Agrawal Case)

या समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये सिया आणि केतन साखरपुड्याच्या सोहळ्यात स्टेजवर उभं असल्याचे दिसत आहे. यावेळी कार्यक्रमाची निवेदिका तिला केतन तुला का आवडतो ? असा सवाल करते. यावेळी सिया ” He Is caring And Kind” असे म्हणत केतनच्या स्वभावाचे कौतुक करताना दिसते. हा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत केतन तिचे शब्द ऐकून हसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!