CJP Nationwide Protest : कॉकरोच जनता पार्टीने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात 24 जुलै रोजी आंदोलन कऱण्याची घोषणा केली आहे. ‘ Every District, One Day, One Demand’ या घोषवाक्याखाली पोलीस अत्याचारांच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.
दिल्ली : 23-07-2026
कॉकरोच जनता पार्टी (CJP) (CJP Nationwide Protest) ने देशभरात आंदोनलाचा विस्तार कऱण्याची मोठी घोषणा केली आहे. पक्षाने ‘Every District, One Day, One Demand’ या घोषवाक्यासह 24 जुलै रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण आंदोलन कऱण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाचा उद्देश कथित पोलीस अत्याचारांविरोधात आवाज उठवणे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवणे असल्याते पक्षाने स्पष्ट केले आहे.
Table of Contents
‘प्रत्येक जिल्हा, एक दिवस, एक मागणी’ मोहिमेची घोषणा (CJP Nationwide Protest)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर प्रसिद्ध कऱण्यात आलेल्या पोस्टद्वारे CJP ने विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांना एकत्र येऊन जिल्हास्तरीय आंदोलने आयोजित कऱण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील पोलीस अत्याचारांच्या बळींप्रती एकजूट व्यक्त करण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रशासनाची समन्वय साधण्याचे आवाहन (CJP Nationwide Protest)
पक्षाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आंदोलनापूर्वी संबंधित प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या घेण्याचे आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या नागरिकांसमोर वाचून दाखवण्याचे आणि शांततेच्या मार्गाने निषेध नोंदरण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.
‼️Nationwide Call For Peaceful Protest‼️ pic.twitter.com/D2jte841z2
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 23, 2026
आंदोलनासाठी एसओपीही जाहीर (CJP Nationwide Protest)
CJP ने आंदोलन सुरळीत पार पाडण्यासाठी SOP, निवेदनाचा मसुदा आणि आवश्यक साहित्या उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली आहे. यामुळे देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच पद्धतीने आंदोलन आयोजित कऱण्याच्या पक्षाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच (CJP Nationwide Protest)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP चे आंदोलन सुरूच असून मोठ्या संख्येने आंदोलक तेथे उपस्थित आहेत. पक्षाच्या प्रतिनिधींनी सरकारसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्या असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी ही प्रमुख मागणी असल्याचे सांगितले आहे. मात्र, या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.