Pune Khadakwasla Dam : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या पावसाने जोर धरलेला आहे. सगळीकडे धुवांधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग कऱण्यास सुरूवात झाली आहे. मूठा नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील प्रसिद्ध असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मुठा नदीचे विशाल रुप पुणेकरांना पहायला मिळत आहे.
पुणे : 08-07-2026
सध्या राज्यभरात (Pune Khadakwasla Dam) सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसत आहे. पुणे आणि घाटमाथ्यावर देखील मुसळधार पाऊस सूरू आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पावासाचा जोर कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्यात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे खडकवासला धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुठा नदीपात्रात सकाळपासून 28 हजार क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मूठा नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील प्रसिद्ध असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मुठा नदीचे विशाल रुप पुणेकरांना पहायला मिळत आहे. दरम्यान थोड्या वेळापूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. 28 हजार क्यूसेक्सने सुरू असलेला निसर्ग आता 18 हजारावर आणण्यात आला आहे. पावसाचा जोर पाहून विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो.
महापौर मंजूषा नागपुरे यांनी केली पाहणी (Pune Khadakwasla Dam)
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी भल्या पहाटेच सिंहगड रस्ता, एकता नगर आणि अन्य विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी कऱण्यात आला आहे. मात्र परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो.
बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू मुसळधार पावसाचा फटका आता तेथील नागरिकांना बसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराच्या चारही बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपातही पावसाचे पाणी गळू लागल्याने विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. सभा मंडप, पायरी मार्ग, मंदिर परिसराचे सुशोभीकरण. पायाभूत सुविधा आणि इतर कामावर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. मात्र, या कामामध्ये योग्य नियोजन आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने पहिल्याच जोरदार पावसात त्रुटी उघड झाल्या आहेत.
🚨महत्वाची सूचना🚨#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या २७ हजार २०३ क्युसेक पाण्याच्या विसर्गामध्ये कमी करुन १८ हजार २७१ ने सुरु आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.नदीपात्रात उतरू नये-जिल्हा प्रशासन#Khadakwasla#Pune#MuthaRiver#Rain#Mansoon
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 8, 2026