Dnyaneshwar Maharaj Palakhiमाऊलींच्या पालखीसाठी 'इंद्रायणी' ही क्षणभर विसावली ! वारकरी विठूनामात दंग ! संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान.

Dnyaneshwar Maharaj Palakhi : सध्या राज्यात सर्वत्र पावासाचे वातावरण आहे. आणि या वातावरणात वारकऱ्यांना वेध लागले आहे ते ‘विठूराया’चे. या वारीतील महत्त्वाच्या दोन पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. प्रस्थानानंतर माऊलींची पालखी आजोळघरी दर्शन मंडप इमारत येथे गांधीवाड्यात विसावली. पहिला मुक्काम आळंदी येथेच असून, गुरूवारी (दि.9 जुलै) सकाळी 6 वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे.

आळंदी : 09-07-2026 

महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू आहे. मात्र विठुरायाच्या ओढीने वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान (Dnyaneshwar Maharaj Palakhi) केले आहे. ‘माऊली माऊली… ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज’ अखंड जयघोष करत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने बुधवारी सायंकाळी (दि.8 जुलै) देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

पहाटे होणार मंदिर प्रदिक्षणा (Dnyaneshwar Maharaj Palakhi)

सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पालखी वीणा मंडपातून निघून मंदिर प्रदिक्षणा करत भरावरस्ता. भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारूती, चावडी चौक आणि महाद्वार चौक मार्गे दर्शन मंडप इमारतीत गांधीवाडा येथे मुक्कामासाठी विसावली. त्यानंतर श्रींची समाज आरती झाली. वारकऱ्यांचा भजनाचा उत्साह परमोच्च होता. वरूणराजाच्या सरी झेलत भजनी मंडली नाचत-गात, विविध वारकरी खेळ खेळत माऊलींच्या जयघोषात तल्लीन झाली होती.

या प्रसंगी प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, पुरूषोत्तम महाराज पाटील, ॲड रोहिणी पवार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे आदी मानकर, खांदेकरी व आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मर्यादित वारकऱ्यांमध्ये प्रस्थान सोहळा (Dnyaneshwar Maharaj Palakhi)

पूरस्थितीमुळे यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. माऊली मंदिर आणि प्रशासनाने सर्व वारकरी व भाविकांना पालखी प्रस्थानासाठी आळंदीत येऊ नये, असे आवाहन केले होते. संस्थानच्या निर्णयानुसार रथापुढील 27, रथामागील 20 आणि पोटभागातील दिंडी अशा एकुण 56 दिंड्यांमधून मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. याशिवाय दिंडीप्रमुख,मानकरी, सेवेकरी, कर्मचारी, पोलीस, आरोग्यव स्वच्छता यंत्रणा यांच्यासह सुमारे 2 हजार व्यक्तींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

पहिला मुक्काम गांधीवाड्यात (Dnyaneshwar Maharaj Palakhi)

प्रस्थानानंतर माऊलींची पालखी आजोळघरी दर्शन मंडप इमारत येथे गांधीवाड्यात विसावली. पहिला मुक्काम आळंदी येथेच असून, गुरूवारी (दि.9 जुलै) सकाळी 6 वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, पुरामुळे पालखी मार्गावरील पुलाचे नुकसान झाले असून त्याची दुरूस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. पूल दुरूस्त न झाल्यास मरकळ रस्त्याने चर्होली मार्गे पालखी पुणे रस्त्यावर येऊन पुढे मार्गस्थ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!