Ketan Agrawal Caseनातवाच्या आठवणीने व्याकूळ केतनच्या आजोबांनीही सोडला प्राण, देवीचंद अग्रवालांचे निधन.

Ketan Agrawal Case : केतन अग्रवालच्या दुदैर्वी निधनानंतर आता त्याचे आजोबा यांचेही निधन झाले आहे. मुलाच्या हत्येनंतर आता वडिलांनाही गमावलं, विशाल अग्रवालांचं स्टेटस, केतनच्या आजोबांच निधन झालं आहे.

पुणे : 05-07-2026 

पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवालच्या (Ketan Agrawal Case) हत्येनंतर अग्रवाल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या या दुःखात आता आणखी भर पडली आहे. केतनचे आजोबा आणि व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे वडील यांचेही आता धक्काने निधन झाले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या स्टेटसवर ‘मिस यू डॅड’ अशी पोस्ट केलीये. त्यांच्या निकटवर्तींयांनी केतनच्या (Ketan Agrawal) आजोबांचे निधन झाल्याचे सांगितले आहे.

देवीचंद अग्रवाल यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची ह्रदयाशी संबंधित शस्रक्रिया पार पडली होती. अशातच त्यांच्या नातवाची केतनची हत्या झाली होती. याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

देवीचंद अग्रवाल होते अस्वस्थ  (Ketan Agrawal Case)

देवीचंद अग्रवाल हे 83 वर्षांचे होते. घरातील तरूण मुलाचे निधन झाल्याने देवीचंद अग्रवाल अस्वस्थ होते. केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चाताप होत होता. याच विचारात ते आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आयसीयुत दाखल कऱण्यात आले होते. पण दोन दिवस आयसीयुत उपचार घेतल्यानंतर त्यांचे काल निधन झाले.

केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी केतनच्या आजोबांनी 19 तारखेला ते सियाचा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे सांगितले होते. सियासाठी आपण गिफ्टही घेतल्याचे देवीचंद अग्रवाल यांनी सांगितले. आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे. मला झोपेत आणि जागेपणी सतत केतनचा चेहरा समोर येत आहे.

मारेकऱ्यांना फाशी व्हावी हीच होती इच्छा (Ketan Agrawal Case)

केतनच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी हीच प्रार्थना आहे. सियाच्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं की, तिचं काहीतरी चालू आहे, त्यांना आम्हाला काहीच सांगितलं नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी आता समजत आहेत, असे केतनच्या आजोबांनी रडत-रडत सांगितले होते.

सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरून 400 फूट खोल दरीत ढकलून दिेले होते. केतनच्या मृत्यूनंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्याची हत्या झाल्याचे समोर आले होते. सध्या सिया आणि चेतन चौधरी हे पोलीस कोठडीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!