Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासात अनेक धक्कादायक खुलासे केल्याचा दावा केला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लोहगडावर हत्या कऱण्यापूर्वी कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कॅफेतील प्लॅनिंग, रिहर्सल, 90 किमीचा प्रवास आणि इतर हलचालींचा तपास सुरू आहे.
पुणे : 29-06-2026
केतन अग्रवाल हत्या प्रकरण ( Ketan Agrawal Murder Case) हे थंड डोक्याने रचलेला कट होता असा पोलिसांनी दावा केला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कसे लोहगडावरून ढकलायचे, इशारा कोणता द्यायचा ? हे सगळं आधीच ठरवलं होतं. या प्रकरणात आता सियाच्या मैत्रिमींसह मित्तल कुटुंबातील सदस्यांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले आहे.
Table of Contents
कॅफेमध्ये कट रचण्यापासून ते हत्या पर्यंत काय घडले ? ( Ketan Agrawal Murder Case)
हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतनने पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. हत्या करण्याच्या पूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर येऊन हत्येसाठी याग्य जागेची निवड देखील केली होती. एवढेच नाही तर तिथे गुन्ह्याचा सराव म्हणजेच रिहर्सल देखील कऱण्यात आला होता. पोलीस आता त्या सराव केलेल्या जागेचा शोध घेत आहेत.
खाली पडतांना पकडू नये म्हणून सियाने काय केले ? ( Ketan Agrawal Murder Case)
18 जूनला लोहगडावरून पोहोचल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसून मागे चालणाऱ्या चेतन चौधरीला इशारा केला. पोलिसांच्या मते केतन दरीत कोसळत असतांना त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये म्हणून ती खाली बसली होती. सियाचा इशारा मिळताच चेतनने केतनला थेट 400 फूट खोल दरीत ढकलून दिले.
90 किमी स्कुटीने प्रवास ( Ketan Agrawal Murder Case)
आरोपी चेतन चौधरी याने पुणे ते लोहगड हे सुमारे 90 किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून पार करून आला होता. जेणेकरून टोल नाक्यावरून सीसीटिव्ही कॅमेऱ्यात आपल्या कारची नोंद होऊ नये. तसेच ओळक लपवण्यासाठी तो किल्ल्यावर चढताना चेतनने ओळख लपवण्यासाठी ‘हुडी’ घातली होती,मात्र वर पोहोचल्यावर तो केवळ काळ्या टी-शर्टमध्ये राहिला. हत्येनंतर पळून जाताने त्याने पुन्हा हुडी घातली आणि त्याच स्कूटरने तो पुण्यात फरार झाला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ती दुचाकी जप्त केली आहे. आरोपी चेतनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत छडा लावला आहे.
पोलीस सियाच्या मैत्रिणी आणि मित्तल कुटुंबाची चौकशी ( Ketan Agrawal Murder Case)
सिया गोयल हित्या अत्यंत जवळच्या दोन मैत्रिणींसह रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल आणि त्यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणवळा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिया आपल्या मैत्रणीसोबत वैयक्तिक आयुष्य आणि गुप्त गोष्टी शेअर करत होती. त्यामुळे या मैत्रिणीच्या चौकशीतून हत्येच्या कटाचे आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.