Pimpri-Nigadi Metro Stationपिंपरी-निगडी मेट्रो मार्ग विस्ताराला येणार वेग, अखेर चौथ्या स्थानकाला मंजूरी ! महापालिकेकडून 25 कोटींचा तरतूद.

Pimpri-Nigadi Metro Station : पिंपरी ते निगडी या भागात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. जो पर्यंत महामेट्रो या भागातील खराब झालेले रस्ते दुरूस्त करत नाही, तोपर्यंत अतिरिक्त अनुदान मंजूर केले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थायी समितीने घेतली होती. मात्र आता हा तिढा सुटला असून, या मार्गावरील मेट्रो स्टेशनला मंजूरी मिळाली आहे.

पिंपरी : 26-06-2026 

महामेट्रोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या पिंपरी ते निगडी (Pimpri-Nigadi Metro Station) या विस्तारित मेट्रो मार्गावरील अतिरिक्त चौथ्या स्थानकाचा (स्टेशन) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (ता-24 ) झालेल्या सभेमध्ये या स्थानकासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीला अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे गेल्या काळापासून रखडलेल्या या विषयावर अखेर पडदा पडला असून, निगडी परिसरातील नागरिकांना आता मेट्रो सेवेचा अधिक कार्यक्षम लाभ घेता येणार आहे.

पिंपरी ते निगडी या भागात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रजोपर्यंत महामेट्रो या भागातील खराब झालेले रस्ते दुरूस्त करत नाही, तोपर्यंत अतिरिक्त अनुदान मंजूर केले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थायी समितीने घेतली होती. याच वादामुळे मे महिन्यात ही मंजुरी दोन वेळा तहकूब करण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासन आणि महामेट्रो यांच्यातील समन्वयानंतर अखेर बुधवारी या खर्चास मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) वतीने पुणे मेट्रो फेज-1 चे विस्तारीकरण निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत केले जात आहे.

मूळ मार्गिका : साडेचार किलोमीटरची उन्नत (उंचावलेले ) मार्गिका (Pimpri-Nigadi Metro Station)

नियोजित  स्थानके : चिंचवड, आकुर्डी आणि भक्ती-शक्ति.

चौथे स्थानक कशासाठी ? : निगडी परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी विचारात घेऊन केंद्र सरकारच्या चौथ्या स्थानकास मंजुरी दिली होती.

खर्चाचे गणित : या प्रकल्पाचा मूळ खर्च 910 कोटी रुपये इतका होता. मात्र, या अतिरिक्त स्थानकामुळे प्रकल्पाचा खर्च 50 कोटी रुपयांनी वाढला असून, आता एकूण प्रकल्प खर्च 960.18 कोटीवर पोहोचला आहे. या वाढीव 50 कोटीपैकी रूपये 25 कोटी रुपये राज्य सरकारच्या नागरी परिवहन निधीतून, तर उर्वरित 25 कोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.

निधीची तरतूद  (Pimpri-Nigadi Metro Station)

केंद्र सरकार 67 कोटी

राज्य सरकार 79 कोटी

अतिरिक्त स्थानक (राज्य नागरी परिवहन निधी ) 25 कोटी

अतिरिक्त स्थानक (पिंपरी-चिंचवड महापालिका) 25 कोटी

प्रकल्पाचा एकूण सुधारित खर्च 960.18 कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!