TET Exam UpdateTET पेपर फुटताच सरकारचा मोठा निर्णय, आता कधी होणार परीक्षा ? ( फोटो-सोशलमीडीया)

TET Exam Update : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रावर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परीषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई : 27-06-2028 

नीट परीक्षेनंतर आता राज्यातील टीईटी परीक्षेचा (TET Exam Update) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याची परीक्षा परीषदेमार्फत कळविण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भिवंडीत प्रश्नपत्रिकेतील माहिती असल्याचा संशय (TET Exam Update)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही, दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली.

समान प्रश्न आढळले (TET Exam Update)

या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीक्षा पुढे ढकलली (TET Exam Update)

या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने दिनांक 28 जून 2026 रोजी नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्यायवत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे.

पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही (TET Exam Update)

टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी म्हटले की, ‘पेपरफुटी’ नंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही, पुनर्परिक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तिघांवरती गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. परीक्षा कधी होणार यांच नियोजन लवकरच कळवण्यात येणार आहेत. सर्व प्रकरणाशी चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!