PM Modi Netherlands : पंतप्रधान मोदी आज तीन दिवसांच्या नेदललँडस दोऱ्यावर दाखल झाले आहेत. ते आणि डच पंतप्रधान रॉब झेटन हरित उर्जा आणि सेमीकंडक्टरवर महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करतील, ज्यामुळे भारताचे तेल संकट कमी होण्यास मदत होऊ शकते.
नेदरलँडस : 16-05-2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या ऐतिहासिक दौऱ्यावर असून, संयुक्त अरब अमिरातीनंतर (UAE) ते आता नेदरलँडसमध्ये (PM Modi Netherlands) दाखल झाले आहेत. 15 ते 17 मे 2026 या तीन दिवसांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नेदरलँडस हा केवळ युरोपमधील एक देश नसून तो तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे महापीठ आहे. पंतप्रधान मोदी आणि डच पंतप्रधान रॉब झेटन यांच्यातील ही भेट भारताला उर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता कऱण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
Table of Contents
हरित उर्जेतून तेल संकटावर मात (PM Modi Netherlands)
भारताला सध्या मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करावी लागते, ज्यामुळे देशाच्या तिजोरीवर मोठा भार पडतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी नेदललँडससोबत ‘ग्रीन हायड्रोजन’ आणि ‘स्वच्छ उर्जा’ या विषयांवर धोरणात्मक करारांवर स्वाक्षरी कऱणार आहेत. नेदरलँडसकडे समुद्रातील पवन उर्जा आणि हायड्रोजन तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. या सहकार्यामुळे भारतातील उर्जा निर्मितीचे स्वरूप बदलणार असून सामान्यांच्या खिशाला परवडणारी वीज आणि इंधन मिळण्याचा मार्ग सुकर होईल.
सेममीकंडक्टर क्षेत्रात भारताची मोठी झेप (PM Modi Netherlands)
आजच्या डिजिटल युगात ‘सेमीकंडक्टर चिप्स’ हे सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. नेदललँडसमधील ‘ASML’ ही कंपनी जगातील प्रगत चिप-मेकिंग मशिनरी बनवणारी एकमेव मोठी कंपनी आहे. मोदींच्या या दौऱ्यात सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत. यामुळे गुजरात आणि दक्षिण भारतात उभारल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर फॅब्सना अत्याधुनिक डच तंत्रज्ञान मिळणार आहे. हे करार यशस्वी झाल्यास भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता तो उत्पादक देश म्हणून जगात नाव कमावेल.
Sharing some more glimpses from the welcome by the Indian community in the Netherlands. pic.twitter.com/Pbh47hZ7kX
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026
युरोपसोबत व्यापाराचा मार्ग खुला (PM Modi Netherlands)
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम टप्प्यात आहे. नेदरलँडस हे युरोपचे ‘प्रेवेशद्वार’ मानले जाते. येथील रोटरडॅम बंदर हे व्यापारासाठी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी डच व्यावसायिक नेत्यांशी चर्चा करून भारतात अब्जालधी डॉलर्ससाठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कृषी. पाणी व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रातही दोन्ही देश नवीन प्रकल्पांची घोषणा कऱणार आहेत.
भारतीय समुदायाशी संवाद आणि जागतिक दबदबा (PM Modi Netherlands)
नेदलँडसमध्ये राहणाऱ्या मोठ्या भारतीय समुदायाला पंतप्रधान मोदी संबंधित करणार आहेत. परदेशात राहणारे भारतीय हे भारताचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ आहेत, असे मोदी नेहमी म्हणतात. या दौऱ्यातून त्यांनी युरोपमधील भारताचा प्रभाव वाढवण्याचे संकेत दिले आहेत. डच पंतप्रधान रॉब झेटन यांच्यासोबतचे त्यांचे वैयक्तिक संबंध आणि नेदरलँडसच्या राजा-राणीसोबतची भेट भारताच्या मुत्सद्देगिरीला एका नव्या उंचीवर नेणारी आहे.