Pune FC Roadपुण्याच्या एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन.

Pune FC Road : पुण्यातील एफसी रोडवरील पदपथांवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केले आहे.

पुणे : 17-11-2026

पुण्यातून (Pune FC Road) एक मोठी बातमी समोर आली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील (एफसी रोड) पदपथांवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमाणाच्या मुद्द्यावरून भाजपच्याच नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केले आहे. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करूनही अतिक्रमाणाचा प्रश्न सुटत नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहेय अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, वाहतुकीची कोंडी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 नगरसेवकांनी केला प्रश्न उपस्थित (Pune FC Road)

नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर, निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी एफसी रोडवरील परिस्थितीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या परिसरातील पदपथांवर अनधिकृत विक्रेते आणि व्यावसायिकांकडून वारंवार अतिक्रमण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आले.

एफसी रोड परिसरात महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे व्हिडिओ काढले जात असल्याच्या तक्रारीही नगरसेवकांनी मांडल्या. त्यामुळे केवळ अतिक्रमणाचा प्रश्न न राहता नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही गंभीर बनला असल्याचे त्यांनी सांगितले. काही महापालिका अधिकारी विक्रेत्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. कारवाईदरम्यान जप्त केलेला माल दंड न आकारता पुन्हा संबंधित विक्रेत्यांना परत दिला असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे अतिक्रमणाविरेधातील कारवाई प्रभावी होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

तातडीने कारवाई करण्याची मागणी (Pune FC Road)

भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही या प्रकरणात तातडीने कारावाई कऱण्याची मागणी केली. एफसी रोडवरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटविण्यासाठी ठोस उपाययोजना कऱण्याची मागणी त्यांनी केली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणाविरोधात आठवडाभरात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता प्रशानाकडून प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *