Ajit Pawar Statue Unveiledअजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण ; सुनेत्रा पवार झाल्या भावुक .

Ajit Pawar Statue Unveiled :  महाराष्ट्राचे अत्यंत लाडके राजकीय नेते म्हणजे अजित पवार. त्यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रासह अवघ्या देशात शोककळा पसरली होती. आजही जनसामान्य त्यांना विसरू शकत नाहीये. दैनंदिन जीवनात त्यांची भाषणे, त्यांच्या हसऱ्या छबी आठवून जनता शोक व्यक्त करत असते. त्यांची अशीच एक प्रसन्न भावमुद्रा पुतळ्याच्या स्वरूपात पुणे जिल्हाधिकारी परिषदेत उभारण्यात आली आहे.

पुणे : 16-11-2026 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे जिल्हा परिषद कार्यालय, यशवंतराव चव्हाण भवन येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे (Ajit Pawar Statue Unveiled)  अनावरण केले.  या अनावरण सोहळ्याला मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्ता भारणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि शरद पवार गटाच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.

पुतळ्यातील अजित दादांची हसरी छबी  (Ajit Pawar Statue Unveiled)

अमित शहा यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अजित पवार प्रवेशद्वारावर आणि पुणे जिल्हा परिषद कार्यालयातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा पाहून अजित दादांचा हसरा चेहरा आणि बोलके डोळे यांची आठवण होते.

बारामतीमध्ये अजित पवार यांचे निधन (Ajit Pawar Statue Unveiled)

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळावरून बारामतीला जात असताना, बारामती विमानतळावर उतरताना त्यांच्या लिअरजेट 45 एक्सआर विमानाला अपघात झाला. या अपघाताता अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाचजणांचा मृत्यू झाला होता.

पुण्यातील अजित पवार यांचे वर्चस्व (Ajit Pawar Statue Unveiled)

अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) एक प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. पुणे परिसरात पवार घराण्याचे वर्चस्व आहे. पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोक अजित पवार यांना प्रेमाने ” अजितदाद” मह्णत असत. त्यांनी पुण्याच्या विकासकामासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य पार पाडली.

अजित पवार यांची दिलखुलास नेता म्हणून ओळख (Ajit Pawar Statue Unveiled)

अजित पवार यांची ओळख एक दिलखुलास नेता अशी होती. एक हसरा, मिश्किल नेता पण तितकाच कड़क प्रशासक अशी त्यांची ओळख जनमानसात कायम कोरली गेली आहे. त्यांचा हाच हसतमुख चेहरा आज पुतळ्याच्या रुपाने विराजमान झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *