Ashok Kharat Case Update : महाराष्ट्रात गाजत असणारे प्रकरण म्हणजे ‘ अशोक खरात’ प्रकऱण. दिवसेंदिवस या प्रकऱणातील गुंतागुंत वाढत आहे. आता या प्रकरणातील आणखी काही माहिती समोर आली आहे. शिर्डी जमीन फसवणूक प्रकऱणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला दिलासा मिळालेला नाही. कल्पना खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : 13-05-2026
नाशिक सेक्स स्कॅडलमध्ये अडकलेल्या भोंदू अशोक खरातशी ( Ashok Kharat Case Update ) कथित संबंधांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरात प्रकऱणात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी चाकणकरांची 6 तास चौकशी केली. चौकशीनंतर आता ईडीकडून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले आहे.
ईडीने याच आठवड्यात चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. खरात प्रकऱणातील आर्थिक व्यवहार आणि मनी लॉंड्रीगच्या कोनातून ईडी चौकशी कऱणार असल्याची माहिती आहे. याआधीही ईडीने या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी केली होती. खरात याने एक मोठे खंडणी रॅेकेट चालवण्याचा आरोप आहे. या रॅकेटच्या माध्यमातून त्याने 70 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केल्याचा संशय आहे. ही मोठी रक्कम वळवण्यासाठी त्याने अनेक बेनामी बँक खाती वापरली होती.
आता याच प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आले आहे. आता त्यांचा या आर्थिक व्यवहारांशी काही संबंध आहे का, याचा यंत्रणा आहेत तपास करत आहे.
कल्पना खरातला दिलासा नाही ( Ashok Kharat Case Update )
शिर्डी जमीन फसवणूक प्रकऱणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला दिलासा मिळालेला नाही. कल्पना खरातवर शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल जमीन फसवणूक प्रकऱणात आरोप आहेत. औरंगबाद खंडपीठाने तिच्या अटकपूर्व जामीनावर या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अशोक खरातला केले जाणार हजर ( Ashok Kharat Case Update )
पीएमएलए अंतर्गत विषेश न्यायलयाने अशोक खरातच्या विरोधात ‘ प्रॉडक्शन वॉरंट’ जाहीर केले आहे. 70 कोटी रुपयांहून अधिक व्यवहारांशी संबंधित कथित खंडणी आणि मनी लॉंड्रिंग प्रकऱणात ईडीने खरातच्या अटकेची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश आर.बी.रोटे यांनी नाशिक कारागृह प्रशासनाला 18 मे रोजी खरातला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.