Rupali Chakankar SIT : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना माध्यमांनी गराडा घातला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकऱणात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक : 10-05-2026
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar SIT) आज नाशिकमध्ये SIT चौकशीसाठी हजर झाल्या. यावेळी त्यांना मध्यमांनी गराडा घातला होता. पण त्यांनी सर्वांच्या संयत आणि शांतपणे उत्तरे दिली. याप्रकरणात त्यांच्यावर जे आरोप झाले आहेत. त्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. भोंदू अशोक खरात संबंधित प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले. त्या एसआयटी टीमसमोर चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.
Table of Contents
रुपाली चाकणकर SIT समोर दाखल (Rupali Chakankar SIT)
रुपाली चाकणकर या एसआयटी चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल झाल्या. एसआयटी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. एसआयटीचा जो तपास सुरू आहे. त्यासंदर्भात त्यांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज मी आले आहे. या तपासात पुर्णपणे माझे सहकार्य असेल. तपासाला सामोरं जात असल्याने जी मदत तपास अधिकाऱ्यांना, पोलिसांना करेल,. त्यांच्या प्रंश्नांना निश्चितपणे उत्तर देईल, असे चाकणकर यांनी स्पष्ट केेले. एसआयटी तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
खरातविषयी काय म्हणाल्या चाकणकर ? (Rupali Chakankar SIT)
भोंदू अशोक खरात यांच्याशी संबंधावर आणि आरोपावरही त्यांनी उत्तर दिले. मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळस हा तपास पूर्ण होईल. त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. तर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची आपल्याला कल्पना नाही असे चाकणकर म्हणाल्या.
ती खाती बनावट (Rupali Chakankar SIT)
समता आणि जगदंबा पतसंस्थेतील सर्व खाती बनावट असल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. या दोन्ही पतसंस्थांमध्ये रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहिणीच्या नावे खाते आढळली आहे. या खात्यातून अनेक व्यवहारही कऱण्यात आले आहे. दरम्यान रुपाली चाकणकर या आपल्या वकिलासह एसआयटी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत वकिलही आहेत. चाकणकर या स्वतःहून या प्रकऱणात नाशिकमध्ये येऊन या चौकशीला सामोरे जात आहेत.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्या काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rupali Chakankar SIT)
रुपाली चाकणकर या भोंदू अशोक खरात याला गुरू मानत होत्या. त्यांचे खरात सोबतचे काही फोटोही समोर आले. त्यात त्या पाद्यपूजा करतानाचाही फोटो होतो. तर याप्रकऱणात काहूर उठल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांची चौकशी कऱण्यात यावी आणि त्यांना या सर्व प्रकऱणात सह आरोपी कऱण्याची मागणी कऱण्यात येत होती.