Table of Contents
जागतिक वारसा दिवस – १८ एप्रिल
जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आणि विविधता यांविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिलला ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ (World heritage) म्हणजेच ‘जागतिक वारसा दिवस’ साजरा केला जातो. पृथ्वीवर असणाऱ्या किंवा मानवाने निर्माण केलेल्या सांस्कृतिक वास्तू, प्रार्थनास्थळं, निर्सगनिर्मित अनेक गोष्टी आज संपूर्ण जगात आहेत. ही सर्व संपत्ती अखिल मानवजातीची आहे, असे समजून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.
त्यासाठीच्या उपाययोजना काय असाव्यात, कसे प्रयत्न करायला हवे या उद्देशाने जागतिक वारसा दिवस साजरा होतो. या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील काही प्रसिद्ध जागतिक वारसास्थळं म्हणून घोषित केलेल्या वास्तूंचा आढावा घेत, त्याठिकाणाला भेट देऊन, त्यांच्याविषयीची माहिती मिळवत आपण हा दिवस (World heritage) साजरा करू शकतो.
भारतातील कोणत्या वास्तूंना जागतिक वारसास्थळांचा दर्जा देण्यात आलेला आहे याची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत. या वास्तूंचा आढावा घेण्याआधी आपण जागतिक वारसा स्थळं कोण ठरवतं त्या संस्थेची माहिती घेऊ.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना – The United Nations Educational, Scientific and Cultural Organization -(UNESCO ) –
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) ही संस्था १९७२ मध्ये स्थापन झाली. या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या जागतिक वारसा (World heritage) अधिवेशनात स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी मिळून जगभरातील वारसास्थळांची यादी निश्चित करण्यात आलेली आहे.
वारसा म्हणजे काय ? –
सांस्कृतिक वारसा म्हणजे स्मारके, जसे की स्थापत्य कलाकृती, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख, इमारती, पुरातत्व स्थळं, नैसर्गिक वैशिष्ट्य जसे की भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश, भूर्गभीय आणि भौमिक रचना- प्राणी आणि वनस्पतीं, ज्यांच्या प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत, किंवा त्यांच्या प्रजातींच्या अधिवासांसह. विज्ञान, संवर्धन किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असलेली नैसर्गिक स्थळे, नैसर्गिक वारसा म्हणून निश्चित करण्यात आलेली आहेत.
भारतातील वारसास्थळांची यादी –
भारताने १४ नोव्हेंबर १९७७ ला या अधिवेशनाचा स्वीकार केला, ज्यामुळे भारताच्या वारसास्थळांच्या यादीचा समावेश झाला. युनेस्कोने भारतातील एकुण ४३ वारसास्थळांचा समावेश जगभरातील वारसास्थळांच्या (World heritage) यादीत केला आहे. ४३ स्थळांपैकी ३५ वारसास्थळे ही सांस्कृतिक वारसास्थळांच्या यादीत मोडतात. सात नैसर्गिक स्थळं आहेत, एक नॅशनल पार्क आहे जे दोन्ही मध्ये मोडते जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक आहे.
भारतातील जागतिक (World heritage) वारसास्थळांची यादी –
- १ आग्रा किल्ला – उत्तर प्रदेश (१९८३)
- २ अजिंठा लेणी – महाराष्ट्र (१९८३)
- ३ वेरूळ लेणी – महाराष्ट्र (१९८३)
- ४ ताजमहल – उत्तर प्रदेश (१९८३)
- ५ सुर्यमंदिर -कोणार्क-ओडिसा – (१९८४)
- ६ महाबलिपूरम् मंदिर -तमिळनाडू – (१९८४)
- ७ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान – आसाम – (१९८५)
- ८ मानस राष्ट्रीय उद्यान – आसाम –(१९९५)
- ९ केवलदेव राष्ट्रीय उद्यान – राजस्थान – १९८५ )
- १० गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट्स –(१९८६) –
- ११ खजुराहो येथील स्मारके – मध्यप्रदेश – (१९८६)
- १२ हंपीमधील मंदिरं आणि स्मारकांचा समुह – कर्नाटक – १९८६
- १३ फतेहपुर सिक्री – उत्तर प्रेदेश – (१९८६)
- १४ पट्टदकल येथील स्मारके – कर्नाटक- १९८७
- १५ घारापुरी एलिफंट लेणी – महाराष्ट्र -१९८७
- १६ चोळ घराण्याची मंदिरं – तमिळनाडू – १९८७
- १७ सुंदरबन राष्ट्रीय उद्यान – वेस्ट बंगाल – १९८७
- १८ नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड- १९८८
- १९ सांची बुद्धस्तुप – मध्यप्रदेश – (१९८९)
- २० हुमायुनची कबर – दिल्ली – (१९८३)
- २१ कुतुबमिनार आणि इतर स्मारके – दिल्ली –(१९९३)
- २२ माऊंटन रेल्वेज ऑफ इंडिया – वेस्ट बंगाल, तमिळनाडू,हिमाचल प्रदेश – (१९९९)
- २३ महाबोधी मंदिर, बोधीगया – २००२
- २४ भिमबेटका, दगडीघळी – मध्यप्रदेश -२००३
- २५ छत्रपति शिवाजी टर्मिनस – महाराष्ट्र -२००४
- २६ चंपानेर -पावागड पुरातत्त्व उद्यान- गुजरात – २००४
- २७ लाल किल्ला -दिल्ली – २००४
- २८ जंतर मंतर, जयपूर – राजस्थान -२०१०
- २९ पश्चिम घाट -कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू -२०१२
- ३०राजस्थानचे डोंगरी किल्ले – (चित्तोडगढ, कुंभलगड, रणथंबोर, गागरोन, अंबर, आणि जैसलमेर ) राजस्थान – २०१३
- ३१ रानी की वाव – गुजरात -२०१४
- ३२ ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान ज हिमाचल प्रदेश -२०१४
- ३३ नालंदा पुरातत्व स्थळ – बिहार -२०१६
- ३४ कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान – सिक्कीम – २०१६
- ३५ ल कॉर्बूझीयेची वास्तुशिल्पे – चंदिगढ – २०१६
- ३६ अहमदाबाद ऐतिहासिक शहर – गुजरात -२०१७
- ३७ मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प – महाराष्ट्र – २०१८
- ३८ जयपुर शहर – राजस्थान – २०१९
- ४९ काकतीय रूद्रेश्वर मंदिर – तेलंगणा – २०११
- ४० धोळावीरा – गुजरात – २०२१
- ४१ शांतिनिकेतन – पश्चिम बंगाल – २०२३
- ४२ होयसळ वास्तूशिल्प समूह – कर्नाटक – २०२३
- ४३ मोईडॅम्स -आसाम – २०२४
जगभरातील उत्तमोत्तम सांस्कृतिक वारसांची (World heritage) जपूवणूक करण्याच्या उद्देशाने युनेस्को काम करत असते. युनेस्कोचे पाच इंग्रजीतील ‘C’ (सी) म्हणजे जागतिक वारसा अधिवेशनाचे समारिक उद्दीष्ट आहेत. ते उद्दीष्टे काय आहेत ते त्यांच्या आद्याक्षरांवरून लक्षात रहावेत म्हणून त्यांना पाच सी असे म्हणतात.
Five ‘C’- पाच सी –
Credibility – विश्वासार्हता
Conservation – संवर्धन
Capacity-building – क्षमता-बांधणी
Communication – संवाद
Communities – समुदाय
या पाच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून युनेस्को जागतिक वारसांच्या संवर्धन आणि संरक्षणाचे काम सातत्याने करत आहे.
आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, परंपरा यांची ओळख होण्यासाठी त्या त्या देशांच्या वारसास्थळांची (World heritage) माहिती असणे, त्यांचे जतन, संवर्धन करणे हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे. भारतीयांची संस्कृती सांगते की वसुधैव कुटुंबकम् यान्यायाने ही संपूर्ण पृथ्वी आपले कुटुंब मानली तर जगभरात जे काही सुंदर, भव्य निर्माण केलं गेलं आहे त्याचे संरक्षण करणे ही मानव म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे. त्यासाठीच हा जागतिक वारसा दिवस साजरा करणे महत्त्वाचे ठरते. जगातील किंवा तुमच्या देशातील कोणते जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ तुम्हाला आवडते हे मला नक्की कळवा. जागतिक वारसादिनाच्या (World heritage day ) सर्वांना मिसलेनियस भारत कडून तुम्हाला शुभेच्छा ….
- ज्योती भालेराव
Leave a Reply