Trump Nobel Prize News'आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही !' नोबेल समितीने ट्रम्पना फटकारले, जगभरात होतयं हसू

Trump Nobel Prize News : व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचे नोबेल पदक डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केले, परंतु नोबेल नियमांनुसार हा पुरस्कार इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही.

न्युयॉर्क : 16-01-2026 

गेले काही दिवस ट्रम्प आणि त्यांना असणाऱ्या नोबेल पुरस्काराविषयीच्या (Trump Nobel Prize News)  ओढीची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच जागतिक राजकारणातील दोन सर्वात चर्चेत असलेल्या व्यक्तिमत्वाच्या गुरूवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. व्हेनेझुएलाच्या लोकशाही लढ्याच्या नायिका आणि 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो (Meria Corina Machado) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. या भेटीत मचाडो यांनी एक अभूतपूर्व पाऊल उचलत आपले सोन्याचे नोबेल पदक ट्रम्प यांना सुपूर्द केले. ” व्हेनेझुएलाला हुकुमशाहीतून मुक्त कऱण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या ऐतिहासिक कामाची ही पावती आहे, ” असे भावूक उद्गार मचाडो यांनी यावेळी काढले. मात्र, या घटनेमुळे आता एक तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. ट्रम्प यांना आता नोबेल विजेते मानले जाईल का ?

व्हाईट हाऊस मध्ये काय घडले ?  (Trump Nobel Prize News )

मिळालेल्या माहितीनुसार, मचाडो यांनी ट्रम्प यांना हे पदक एका सोन्याच्या फ्रेममध्ये मढवून दिले. या फ्रेमवर ट्रम्प यांच्या, “असाधारण नेतृत्वाचा आणि शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांचा ” गौरव करणारा मजकूर लिहिला होता. ट्रम्प यांनीही या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मचाडो यांचे आभार मानले आणि याला “परस्पर आदराचा एक अद्भूत संकेत” म्हटले. ट्रम्प यांनी अनेकदा नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मचाडो यांनी त्यांना स्वतःचे पदक देणे ही घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

नोबेल समितीचा यासाठी नकार, नियम काय म्हणतात ?  ( Trump Nobel Prize News )

मचाडो यांनी जरी आपले पदक ट्रम्प यांना दिले असले, तरी नोबेल फाऊंडेशन (Nobel Foundation) आणि नॉर्वेजियन नोबेल समितीने यापूर्वीच यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 9 जानेवारी 2026 रोजी जाहीर केलेल्या एका विशेष निवेदनात समितीने म्हटले आहे की, ” नोबेल पुरस्काराचे नियम स्पष्ट आणि काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत. एकदा जाहीर झालेला पुरस्कार कधीही रद्द (Revoked) करता येत नाही, तो दुसऱ्या कोणाशी सामायिक (Shares) करता येत नाही किंवा तो इतर कोणालाही हस्तांतरीत (Transferred) करता येत नाही. हा निर्णय अंतिम असतो. “

याचाच अर्थ असा की, ट्रम्प यांच्याकडे प्रत्यक्ष पदक असले, तरी जागतिक नोंदीनुसार आणि अधिकृत इतिहासात ‘2025 नोबेल शांतता पुरस्कार’ विजेत्या म्हणून केवळ मारिया कोरिना मचाडो यांचेच नाव राहील. ट्रम्प यांना तांत्रिकदृष्ट्या ” Nobel Laureate” ही पदवी वापरता येणार नाही.

मचाडो यांच्या निर्णयावर टिका ( Trump Nobel Prize News )

मचाडो यांच्या या निर्णयावर मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला ” कृतज्ञतेचे सर्वोच्च प्रतीक” म्हटले आहे, तर काहींनी याला ” पुरस्काराचे अवमूल्यन” असल्याचे म्हटले आहे. विशेषतः जेव्हा ट्र्म्प यांनी व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावर मचाडो यांच्याऐवजी तिथल्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले होते, तेव्हा त्यांना प्रभावित करण्यासाठी मचाडो यांनी हा ‘नोबेल डाव’ खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळाच आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!