ketan Agrawal Case Updateसिया गोयलच्या पालकांच्या अडचणीत वाढ, पोलीसांना द्यावी लागणार उत्तरे .

ketan Agrawal Case Update : पुण्यातील गाजणारी  हायफ्रोफाइल मर्डर केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल हत्येमध्ये आरोपी असणारी सिया गोयल आणि तिच्या पालकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, सिया हिच्या आई-वडिलांची चौकशी होणार आहे. सियाच्या आई-वडिलांना पोलीसांच्या काही विशेष प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे.

पुणे : 27-06-2027

केतन अग्रवाल याच्या हत्येमुळे  सध्या पुणे शहरात (ketan Agrawal Case Update) एकच खळबळ माजलेली आहे. सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवालचा काटा काढल्यामुळ, दोघांच्या कुटुंबियांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणी सिया हिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाले गोयल पति-पत्नी (ketan Agrawal Case Update)

आमच्या मुलीची चूक असेल तर, तिला देखील लोहगड येथून ढकलून द्या, अशी प्रतिक्रिया सिया हिच्या आई-वडिलांनी दिली आहे. दरम्यान या सगळ्या त्यांच्या वक्तव्यांनंतर त्यांना पोलीसांना काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

सिया गोयलच्या आई-वडिलांना कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहेत ? (ketan Agrawal Case Update)

  • 1 सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का ?
  • 2 सियाने चेनतशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का ?
  • 3 सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का ?
  • 4  सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का ?
  • 5 सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का ?
  • 6 लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का ?
  • 7 लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती ?
  • 8 केतनच्या हत्येचा कट रचला जात होता ? याबाबत तुम्हाला कल्पना होती का ?

केतन अग्रवाल प्रकरणाबाबत सांगायचं तर, या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चेतन चौधरी आणि सिया गोयलने मिळून केतनच्या हत्येचा प्लॅन केला होता. केतनला मारण्यासाठी सिया आणि चेतनने मे महिन्यापासून लोहगड किल्ल्याची रेकी सुरू केली होती.

फेब्रुवारीमध्ये सियाचा साखरपुडा झाला होता, नोव्होंबरमध्ये सिया आणि केतनचं लग्न होणार होतं. पण केतन सोबतच लग्न तिला मान्य नव्हतं. हे लग्न होऊ नये म्हणून चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी प्रयत्न चालू केले होते. दोघांनीही या हत्येसाठी जागा निवडली आणि पुढील हत्येचे प्लॅनिंग केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!