Nasrapur Case Updateनसरापूर केसमधील हैवानाला होणार आज शिक्षा, !

Nasrapur Case Update : महाराष्ट्रात दिनाच्या दिवशी पुणे जिल्हा आणि संपूर्ण देश हदरला होता, त्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. थोड्याच वेळात चिमुकलीवर अत्याचार कऱणाऱ्या त्या नराधमाला न्यायाधिश शिक्षा सुणावणार आहेत. न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान बशर अली प्रकरणाचा दाखला दिला. अपहरण, अत्याचार, हत्या आणि पोक्सो अंतर्गत क्रूर गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी भीमराव कांबळे कठोर शिक्षेची शक्यता आहे. न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुणे : 29-06-2026

संपूर्ण देश महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे 2026 ला हदरून गेला. नसरापूरमध्ये (Nasrapur Case Update )भीमराव कांबळे या नराधमाने एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या हत्याकांडाचा निकाल आज लागणार आहे. पुण्याच्या शिवाजी नगर न्यायालयाकडून हा निकाल दिला जाणार आहे. आरोपीला या पूर्वीच कोर्टाने दोषी ठरवले आहे. तसेच त्याला दोषी ठरवताना तुला कोणती शिक्षा हवी ? फाशी की जन्मठेप ? तूच सांग. असे विचारण्यात आले होते. 1 मे रोजी केलेले कृत्य तु आठव, असे न्यायाधिश म्हणाले होते. त्यानंतर आज कोर्ट आरोपी भीमराव कांबळे याला काय शिक्षा देणार ? याकडे मुलीचे आई-वडील आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे.

आरोपी भीमराव कांबळेला (Nasrapur Case Update)  कोर्टात आणण्यात आले आहे. तसेच कोर्टात दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या जात आहेत. एस.आर. साळूंखे यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायाधीशांनी काही राज्यात घडलेल्या केसचा दाखला दिला. तसेच बशर अली केसमध्येही असेच घडले होते, असे न्यायाधीशांनी सांगितले. काही घटना वाचून दाखवल्यानंतर मृत्यूदंडाती शिक्षा त्याला देण्यात आली होती, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

आरोपीला अपहरण, अत्याचार, हत्या आणि पोक्सो अंतर्गत शिक्षा कऱण्यात येणार आहे. आरोपीचा गुन्हा अत्यंत क्रूर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकऱण ? (Nasrapur Case Update )

1 मे रोजी भीमराव कांबळे याने एका छोट्या निरागस मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने फूस लावून तिला पळवले. तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होतीय ही मुलगी आजीकडे सुटीसाठी आली होती. एकटीच ती अंगणात खेळत होती. भीमराव कांबळेने या मुलीवर पाळत ठेवून तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर या मुलीची हत्या करण्यात आली होती. ही घटना उघड झाल्यावर संतापाटी लाट उसळली होती. या प्रकरणी राज्यभरात निर्दशने झाली होती. त्यामुळे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाचा वेगाने तपास करून भीमराव कांबळेला अटक केली. त्याच्यावर अवघ्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल केले होते. 1 हजार 200 पानांचे दोषारोपपत्र होते.

पोलिसांनी मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्ष साक्षीदार, पंच, न्यायवैधक अधिकाऱ्यांचा अहवाल आणि घटनास्थळी मिळालेले पुरावे या आधारे दोषारोपपत्र तयार केले होते. या प्रकऱणात 50 हून अधिक लोकांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या. सीसीटिव्ही फुटेजही तपासण्यात आले होते.

या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली तेव्हा सरकारी वकिलांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. प्रत्येक घटनाक्रम कोर्टाच्या नजरेत आणून दिला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!