Nasrapur Case Result'नराधम कांबळेला मृत्यूदंड की जन्मठेप ? नसरापूर केसचा निर्णय लवकरच होणार.. नराधम कांबळेचा गुन्हा सिद्ध !

Nasrapur Case Result : मे महिना पुणे जिल्हा हदरला तो नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी अवघ्या दी़ड महिन्यात न्यायालयाने निकाल दिल. विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवले असून शिक्षेबाबत युक्तीवाद सुरू आहे.

पुणे : 25-06-2026

पुणे जिल्ह्यातील नसरापूर (Nasrapur Case Result) येथील बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणामुळे अवघा देश हदरला होता. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्रदिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून कऱण्यात आला होता. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल आज (गुरूवारी 25 जून 2026 ) लागत आहे.

राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलगदीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात इतकया जलद गतीने निकाल देणारे हे पहिलेच प्रकरण आहे.

आज कोर्टात नराधम आरोपी भीमराव कांबळे याच्यावरील गुन्हा सिद्ध झाला असून, त्याला काय शिक्षा ठोठावली जाणार याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 29 जून ला शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यासाठीचा निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी भीमराव प्रभाकर कांबळेला अटक केली असून पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विेशेष न्यायाधीश एस.आर.साळूंखे यांनी आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयात सध्या शिक्षेवर सुनावणी सुरू आहे. आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आले. विशेष न्यायाधीश एस.आर.साळूंखे यांनी निकाल जाहीर केला असून शिक्षेबाबतचा युक्तीवाद सध्या सुरू आहे.

न्यायालयातील घटनाक्रम (Nasrapur Case Result)

नसरापूर हत्याकांडातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवले असून, सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि घटनेची आठवण करून आपली शिक्षा सांगण्यास सांगितले. आरोपी भीमराव कांबळे न्यायालयात वेगळीच कहाणी सांगत होता. ” त्या दिवशी मी मुलीला गाठी-शेव खाऊ घालण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी माझा पाय घसरला आणि मी पडलो. त्याचवेळी मुलीच्या डोक्यालाही दुखापत झाली. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती रडतच राहीली.”

त्यानंतर न्यायाधीशांनी दोषी भीमराव कांबळेला सांगितले की, तु आता जे काही सांगितले ते आता इतिहासजमा झाले आहे, कारण तुझ्याविरूद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे. तुला काय शिक्षा द्यावी? भीमराव कांबळेने या प्रश्नावर काहीही उत्तर दिले नाही. दोषी भीमराव कांबळेला कोणती शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांमध्ये न्यायाधीशांसमोर चर्चा सुरू आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद (Nasrapur Case Result)

भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने 39 मिनीटे अतिशय घृणास्पद प्रकारे अत्याचार केला. वैद्यकीय तपासणीत भिमराव कांबलेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखमा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या. समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात.

मात्र असे कृत्य केले तर भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीने फक्त वासनेपोटी हे कृत्य केले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल हे देखील न्यायालयात आले होते. सरकारी वकिलांकडून अशाच गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांचा संदर्भ देण्यात आला.

आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हलण्याची भिती देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कऱण्यात यावी, जेणेकरून कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना चारवेळा विचार करेल, अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली.

आरोपीला त्याचे कुटुंबीय सुद्धा वाचवायला आले नाहीत. या गुन्हेगाराचे वय पहाता तो सुधारू शकत नाही. त्याच्या देहबोलीवरून त्याला कोणताही पश्चाताप झालेला नाही. शिक्षा होणार हे सिद्ध झाल्यावर, त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही, असे सरकारी वकील म्हणाले.

न्यायाधीश ही घटना समाजासाठी घातक आहे. त्या दुर्देवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झालेत,परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध झाला आहे. या आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता तो कोणत्याही परिस्थितीत सुधारू शकत नाही. या आधीच्या दोन गुन्ह्यांमध्ये हा आरोपी दुर्दैवीरित्या सुटला होता. मात्र तो समाजासाठी घातक आहे. त्यामुळे त्याला फाशी हीच योग्य शिक्षा आहे, असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.

आरोपीच्या वकिलांचे मुद्दे (Nasrapur Case Result)

आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लागत नसल्याचा युक्तिवाद केला आहे. त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी तो स्वतः या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा आणि तो 65 वर्षांचा वृद्ध असल्याता युक्तिवाद केला आहे. तो वृद्ध असल्याने इतका क्रूर गुन्हा करू शकतो का ? असा आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जन्मठेप ही या आरोपीला योग्य शिक्षा राहिल असा दावा केला आहे.

आरोपीला सात मुली आहेत. पत्नी आणि, मात्र कोणीही त्याची बाजू घ्यायला पुढे आलेले नाही. समाजाने या आरोपीचे अस्तित्व नाकारले आहे. न्यायालयाने या आरोपीला विचार करायला वेळ दिला होता. त्यानंतर त्याला काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र तो त्यावर निरूत्तर झाला. आरोपीचे मेंटल हेल्थ आणि फिजिकल रिपोर्ट हे सिद्ध करत आहेत की, तो मेंटली फिट आहे आणि तो लैंगिक कृत्य कऱण्यास सक्षम आहे.

आज सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक आरोपी भीमराव कांबळे याला घेऊन पुणे न्यायालय आवारात पोहोचले. सुरक्षेची काळजी घेत आरोपीला न्यायालयाच्या एका विशेष खोलीमध्ये ठेवण्यात आले. ज्या खोलीत आरोपीला ठेवण्यात आले आहे, त्या खोलीच्या बाहेर आणि आजूबाजूच्या परिसरातरी पोलिसांचा कडक पहारा होता. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदेशीर प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी हा कडक बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!