Lionel Messi FIFA World CupLionel Messi चा विश्वविक्रम ! सलग सात विश्वचषक सामन्यांत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.

Lionel Messi FIFA World Cup : अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक 2026 मध्ये जॉर्डन विरूद्ध फ्रि-किकवर गोल करून इतिहास रचला. तो सलग सात फिफा विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

फिफा विश्वचषक 2026 : 28-06-2026

फिफा विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत दिग्गज फुटब़ॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi FIFA World Cup) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अर्जेंटीनाच्या कर्णधाराने जॉर्डनविरूद्ध एक शानदार फ्री-किक गोल करून आणखी एक विश्वविक्रम केला आहे. मेस्सी आता सलग सात फिफा विश्वचषक सामन्यांमध्य गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. जे आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने केले नाहीये. मेस्सीने जॉर्डनविरूद्धतच्या ‘गट जे’ मधील अंतिम सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली.

लिओनल मेस्सीने रचला इतिहास Lionel Messi FIFA World Cup

डॅलसमध्ये खेळल्या गेलेल्या ‘ग्रुप जे’ च्या सामन्यात अर्जेंटिना आधीच पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला होता, त्यामुळे मेस्सीला सुरुवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. तो सामन्याच्या 60 व्या मिनिटाला लॉटरो मार्टिनेझच्या जागी मैदानात उतरला. त्यानंतर, 80 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी बॉक्सच्या अगदी बाहेर फ्री किकि मिळाली. मेस्सीने आपल्या खास शैलीत, खेळाडूंची भिंत भेदून चेंडू थेट गोलपोस्टच्या कोपऱ्यात मारला.

या गोलसह, मेस्सीने सलग सात विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करण्याचा एक अनोखा विक्रम रचला. यापूर्वी हा विक्रम फ्रान्सच्या जस्टिन फॉन्टेन आणि ब्राझिलच्या महान जारझिन्हो यांच्या नावावर होता, ज्यांनी प्रत्येकी सलग सहा विश्वचषक सामन्यांमध्ये गोल केले होते. मेस्सीने त्या दोघांनाही मागे टाकत एक नवीन इतिहास रचला.

2026 च्या विश्वचषकातही उत्कृष्ट कामगिरी Lionel Messi FIFA World Cup

मेस्सीच्या विक्रमाची सुरूवात 2022 फिफा विश्वचषकाच्या सेमिफायनलमध्ये झाली. त्यानंतर त्याने फ्रान्सविरूद्धच्या अंतिम सामन्यातही गोल केले. मेस्सीच्या 2026 च्या फिफा विश्वचषकातही उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत, मेस्सीने 2026 च्या विश्वचषक स्पर्धेतही आपली छाप सोडली. 16 जून ला अल्जेरियाविरूद्ध हॅटट्रिक केली. 22 जून रोजी त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन गोल केले आणि आता जॉर्डनविरूद्ध आणखी एख गोल करून, त्याने सलग सात सामन्यांमध्ये गोल करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

या गोलमुळे मेस्सीच्या नावावर आता फिफा विश्वचषकातील एकूण 19 गोल झाले आहेत. हा त्याच्या कारकिर्दितील 72 वा आणि अर्जेंटिनासाठी केलेला 12 फ्रि-किक गोल होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील 202 सामन्यांमध्ये मेस्सीच्या नावावर आता 123 गोल आहेत.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो 145 गोलांसह अव्वल स्थानी कायम आहे. अलीकडेच, मेस्सी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला . त्याने जर्मनीचा महान फुटबॉलपटू मिरास्लोव्ह क्लागे यांचा 16 गोलांचा विक्रम मोडला. ्

अर्जेंटिनाचाही विश्वविक्रम Lionel Messi FIFA World Cup

मेस्सीच्या ऐतिहासिक गोलमुळे अर्जेंटिनाने गट फेरीचा शेवट दिमाखात केला आणि एक महत्त्वाचा टप्पा गाठल आहे. ब्राझील आणि जर्मनीनंतर, अर्जेंटिना आता फिफा विश्वचषकाच्या इतिहासात 50 किंवा त्याहून अधिक विजय नोंदवणारा तिसरा संघ ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!