India In SCO Meeting : भारताने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी SCO बैठकीत जगाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
शांघाय : 28-04-2026
सध्या जागतिक स्तरावर (India In SCO Meeting) अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू आहे. यामुळे संपूर्ण जगभरात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर जगाला शांततेचा संदेश दिला आहे. भारताने शांघाय सहकार्य (SCO) व्यासपीठावरून दहशतवाद आणि युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, कोणताही वाद युद्धाने न सोडवता, संवादाच्या मार्गाने कुटनीतिने सोडवण्यात यावा.
दहशतवादाच्या मुद्द्यावर जगाला इशारा (India In SCO Meeting)
राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर जगाला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, दहशतवाद मानवतेसाठी मोठा शत्रू असून त्याविरोधात भारताचे धोरण झिरो टॉलरंस राहील. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत म्हटले की, ही घटना केवळ एका देशावर हल्ला नसून संपूर्ण मानवजातीवर वार आहे.
ऑपरेशन सिंदूर चा उल्लेख करत राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, दहशवादी कोणत्याही शिक्षेपासून सुटू शकणार नाहीत. हे भारताच्या शून्य सहनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे असे त्यांनी म्हटले, त्यांनी स्पष्ट केले की, दहशवादावा कोणताही धर्म आणि सीमा नसते. यामुळे सीमेवर होणाऱ्या दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजूट होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
जागतिक व्यवस्थेवर भाष्य (India In SCO Meeting)
राजनाथ सिंह यांनी, भारत केवळ नवी जागतिक व्यवस्था तयार करण्यापेक्षा अधिक सुव्यवस्थित जग करण्यावर भर देतो हे स्पष्ट केले आहे. एकतर्फी निर्णयामुळे जागतिक शांतता धोक्यात येते. युद्धामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर अर्थव्यवस्थाही कोलमडते. यामुले सर्वांनी कट्ट्रवादी आणि फुटीवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.
शांतता हाच एकमेव मार्ग (India In SCO Meeting)
राजनाथ सिंह यांनी प्रादेशिक स्थिरता राखून, द्विपक्षीय मतभेद बाजूला ठेवून सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी परिषदेत संदेश दिला की, SCO आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करणारा संरक्षण म्हणून याविरोधात काम करणे आवश्यक आहे. तरच जगाची समृद्धी होईल असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. केवळ प्रादेशिकच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे हे भारताने सांगितले. भारताच्या या भूमिकेकडे विश्वबंधुत्वाचा संदेश म्हणून पाहिले जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ के दौरान हमने स्पष्ट कर दिया कि आतंकवाद के केंद्र अब सज़ा पाने से किसी भी तरह बच नहीं सकते। यह ऑपरेशन आतंकवाद और उसके समर्थकों के प्रति हमारे ‘zero tolerance’ दृष्टिकोण का प्रमाण है। pic.twitter.com/Qg2vA2sv9d
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 28, 2026