Education CET News : वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी दिलेले उत्तर आणि अचूक उत्तर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. शेवटच्या तारखेनंतर सीईटीचा आक्षेप ट्रॅकर बंद होईल.
मुंबई : 29-04-2026
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 (Education CET News) मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी तंत्र शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमसीए व एम. एचएमसीटी (CET) या दोन अभ्यासक्रमाच्या व उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असेलल्या एमपीएड, एमएड, 3 वर्षीय एलएलबी, बीपीएड, बीएड-एमएड (3 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) व बीएड या सहा अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा झाल्या आहेत. या सीईटीच्या प्रवेश परीक्षेतील प्रश्नांवर आणि उत्तरांंवर आक्षेप नोंदविण्याचे वेळापत्रक सीईटी कक्षाने जाहीर केले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मार्च व एप्रिल 2026 मध्ये तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एम.एचएमसीटीची प्रवेश परीक्षा 25 मार्च 2026 व एमसीएची प्रवेश परीक्षा 30 मार्च 2026 ला झाली व उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमपीएडची प्रवेश परीक्षा 24 मार्च 2026, एमएडची प्रवेश परीक्षा 25 मार्च 2026, बीएडटी प्रवेश परीक्षा 27 मार्च ते 29 मार्च 2026, 3 वर्षीय एलएलबीची प्रवेश परीक्षा 1 व 2 एप्रिल 2026, बीपीएडची प्रवेश परीक्षा 4 एप्रिल 2026 व बीएड-एमएडची (3 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) प्रवेश परीक्षा 9 एप्रिल 2026 रोजी झाल्या.
Table of Contents
विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर उपलब्ध (Education CET News)
या संबंधित सीईटी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेकश्न ट्रॅकर उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून त्यांना सीईटी प्रवेश परीक्षेत दिलेल्या प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवता येईल. विविध सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑब्जेक्शन ट्रेकरचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे.
सीईटीच्या प्रश्नांवर व उत्तरावर आक्षेप नोंदविण्याचे वेळापत्रक (Education CET News)
एम.एचएमसीटी व एमसीए
सुरूवातीची तारीख : 30 एप्रिल 2026
शेवटची तारीख : 2 मे 2026
एमपीएड, एमएड, 3 वर्षीय एलएलबी
बीपीएड, बीएड-एमएड
(3 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम )
सुरूवातीची तारीख : 1 मे 2026
शेवटची तारीख : 3 मे 2026
बीएड
सुरूवातीची तारीख : 3 मे 2026
शेवटची तारीख : 5 मे 2026
वरील वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी दिलेले उत्तर आणि अचूक उत्तर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. शेवटच्या तारखेनंतप सीईटीचा आक्षेप ट्रॅकर बंद होईल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला प्रश्नपत्रिक किंवा ‘उत्तर की’ मधील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असेल तर वरील परीक्षेसाठी आक्षेप ट्रॅकिंग पर्यायाद्वारे आक्षेप नोंदवू शकतो, वरील वेळापत्रकानुसार विद्यार्थ्याला त्याच्या ल़ॉगिनद्वारेच आक्षेप सादर करता येईल. विद्यार्थ्याला प्रती प्रश्न/ प्रती आक्षेपासाठी लागणारी रक्कम ऑनलाईन लॉगिनद्वारे भरावी लागणार असल्याचे कळविण्यात आले आहे. ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले प्रश्न आणि उत्तरासंबंधीचे निवदेन/ तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार जर सीईटी प्रेवश परीक्षेतील प्रश्नांवर आणि उत्तरांवर काही आक्षेप असतील तर ते या ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे नोंदवावेत असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे.