Dharmendra Pradhan Resignationधर्मेंद प्रधान राजीनामा देणार का ? CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक ठरवणार का भविष्य ?

Dharmendra Pradhan Resignation : दिल्लीतील CJP च्या संसंद मोर्चादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतल्याने त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे.

दिल्ली : 20-07-2026 

सध्या दिल्लीत आंदोलनाचे वारे वहात आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्याने जंतर-मंतरवर (Dharmendra Pradhan Resignation) पोलीस आणि सुरक्षा दल तैनात कऱण्यात आले आहेत. कॉकरोच पार्टीने (CJP) आज संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनपर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली. यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात वाद निर्माण झाला. परिस्थिती चिघळल्याने रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. या कारवाईनंतर जंतर-मंतर आणि आजूबाजूच्या परिसरात तणाव निर्माण झाला.

धर्मेंद्र प्रधान गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला (Dharmendra Pradhan Resignation)

दरम्यान, एक मोठी राजकीय घडामोडही समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि भेटीचा आंदोलनाशी किंवा राजकीय घडामोडींशी काही संबंध आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नीट पेपरफुटी प्रकऱणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत झुरळ जनता पार्टी (सीजेपी) संसदेकडे मोर्चा काढत आहे. दरम्यान, अभिजीत दीपकेने आपले उपोषण संपवले आहे. 23 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या इतर तीन विद्यार्थ्यांनीही आपले उपोषण संपवले आहे. पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आहेत. संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद कऱण्यात आले आहे.

जंतर मंतर येथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था (Dharmendra Pradhan Resignation)

सुरक्षा अधिक मजबूत कऱण्यासाठी जंतर मंतर, पार्लमेंट स्ट्रीट, सेंट्रल व्हिस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक यांसारख्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था स्थापित करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांच्या जवानांचे दोन स्तर आणि निमलष्करी दलांचा एक स्तर समाविष्ट आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जलद प्रतिसाद पथके 24 तास सज्ज आहेत. नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सार्वजनिक सूचना जाहीर केली . त्यांनी लिहिले, ” दिल्ली पोलीस हे स्पष्टपणे सांगत आहे की, अशा कोणत्याही निषेध मोर्चा किंवा मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी मागितलेली नाही किंवा दिलेली नाही.”

कलम 163 लागू (Dharmendra Pradhan Resignation)

डीसीपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, पावसाठी अधिवेशन आणि आंदोनांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत भारतीय नगरी सेवा संहितेचे (BNSS) कलम 163 (पूर्वीचे कलम 144) लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत, पाच किंवा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर, आंदोलनांवर, मिरवणूकांवर किंवा धरणे आंदोलनांवर संपूर्ण बंदी असेल. शांततापूर्ण निर्दशनांना फक्त जंतर मंतर येथेच परवनागी दिली जाईल, आणि तीही पूर्वपरवानगीने, या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन कऱणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 223 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दिल्ली पोलिसांनी सर्व नागरिकांना कायद्याचा आदर कऱण्याचे आणि कोणत्याही अनधिकृत मोर्चांमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!