Check Point Charlie – A mark of the division of Germany! (Made in 1961)

Check Point Charlie

चेक पॉईंन्ट चार्ली (Check Point Charlie) – जर्मनीच्या विभाजनाचे निशाण !

दुसरे महायुद्ध, विध्वंस आणि जर्मनी यांचा फार जवळचा संबध आहे. या महायुद्धामुळे जगाचे राजकारण बदलेले, त्याच्या कैकपट अधिक ते जर्मनी या देशाचे बदलले असे म्हटले तर ते चुकिचे ठरणार नाही. आज आपण जो जर्मन देश बघतो तो अत्यंत शिस्तप्रिय आणि शांत आहे. अनेक देशांतील नागरिक आज या देशात वास्तव्यास आहेत.

मात्र दुसऱ्या महायुद्धापर्यंत त्यांनी पाहिलेला वंशवाद, विध्वंस, त्यामुळे या देशाला भोगावे लागलेला विनाश याचा इतिहास फार मोठा आहे. आज जर्मनीची राजधानी असणारे बर्लिन हे शहर शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे.

मात्र दुसऱ्या महायुद्धात हार पत्करल्यानंतर सर्वात पहिले विभागले गेले ते हेच शहर. आजही आपल्याला हे शहर फिरताना त्याच्या पाऊलखुणा सापडतात. त्याकाळी झालेला विध्वंस, राजकारण याचे दाखले येथील अनेक स्मारकांमध्ये, रस्त्यांवर विखुरलेले आहेत. अशाच महत्त्वाच्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे ‘चेक पॉइंट चार्ली (Check Point Charlie) .

Check Point Charlie

दुसऱ्या महायुद्धाची थोडक्यात माहिती .

केव्हा झाले हे युद्ध –

दुसऱे महायुद्ध १९३९ ते १९४५ या दरम्यान झाले. जर्मनीने त्याच्या शेजारील पोलंड देशावर १ सप्टेंबर १९३९ला हल्ला केला आणि दुसरे महायुद्ध अधिकृतपणे सुरु झाले. त्यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि त्याच्या अधिपत्याखालील देशांनी जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारले तर फक्त जपान आणि इटली या दोन देशांनी जर्मनीला साथ केली होती.

सुरुवातीला अमेरिका या युद्धात सहभागी नव्हती मात्र १९४१च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केले आणि अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पडले. अमेरिकेने सहभाग घेतल्यानंतरच हे युद्ध खऱ्या अर्थाने जगभर वणव्याप्रमाणे पसरले. त्यानंतर या युद्धाचे दोस्त राष्ट्र आणि अक्ष राष्ट्र असे विभाजन झाले.

Check Point Charlie

दोस्त राष्ट्र समुहातील राष्ट्र –

या समुहामध्ये चीन, रशिया, इंग्लड, अमेरिका व इतर राष्ट्रे होती. अक्ष राष्ट्रे – या समुहामध्ये जर्मनी, जपान, इटली हे देश होते.

मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी या युद्धामुळे घडली. शेवटी दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि जर्मनी दोन भागांमध्ये विभागली गेली. खरं तर १ सप्टेंबर १९३९ ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले त्यापूर्वीच जर्मनीचा नाझी नेता ॲडॉल्फ हिटलर आणि सोव्हिएत संघाशी मैत्री करार केला होता. पोलंडनंतर हळूहळू जर्मनीने नॉर्वे, नेदरलँडस्, बेल्जियम आणि फ्रान्स पादाक्रांत केले होते.

१९४१ च्या मध्यापर्यंत जर्मनीने पश्चिम युरोप जिंकले होते. फक्त युनायटेड किंग्डम जर्मनीला जिंकता आले नव्हते. तोपर्यंत हिटलर सोव्हिएत संघावर उलटला आणि २२ जून १९४१ ला जर्मनीने सोव्हिएत संघावर चाल केली. पुढे ती चाल सोव्हिएत संघाने उलटवून लावली. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने आणि तेथील नागरिकांनी सोव्हिएत सैन्याला झुंज दिली. परंतु सोव्हिएत सैन्याने बर्लिन जिंकले.

पुढे ३० एप्रिल १९४५ ला हिटलरने बंकरमध्ये आत्महत्या केली. आणि बर्लिनसह जर्मनी विभागले गेले होते. त्या विभाजनासाठी बर्लिनची भिंत बांधण्यात आली होती. या भिंतीच्या निर्मीतीनंतरही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी काही अधिकृत जागा निश्चित केल्या होत्या.

चेक पॉईंट चार्ली (Check Point Charlie) कसे तयार झाले.

बर्लिन भिंत १९६१ मध्ये बांधण्यात आली तेव्हा तत्कालिन अमेरिकी राष्ट्रपति जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकन सैनिकांना आदेश दिले होते की पश्चिम बर्लिनमधून पूर्व बर्लिनकडे ये-जा करण्यासाठी तीन क्रॉसिंग पॉईंट तयार करा. जर्मनीचा सर्वात मोठा पूर्व भाग सोव्हिएत संघाकडे आला होता, तर पश्चिम भाग हा युनायटेड किंग्डम, फ्रान्स आणि अमेरिकेच्या ताब्यात होता.

या सर्व देशांच्या सैनिकांना,अधिकाऱ्यांना, पर्यटकांना आणि राजकीय नेत्यांना पूर्व भागातून पश्चिम भागाकडे जाण्यासाठी असे क्रॉसिंग पॉईंट करण्यात आले.त्यापैकी ‘चार्ली चेक पॉईंट’ (Check Point Charlie) या क्रॉसिंग लाईन मधूनच पूर्वेकडून पश्चिमेकडे जाता येत असे. या कारणामुळेच चार्ली चेक पॉईंटला विशेष प्रसिद्धी मिळाली.

Check Point Charlie

चेक पॉइंट चार्ली (Check Point Charlie) म्हणजे काय ?

या देशाच्या विभाजनाची आठवण करून देणारे हे एक महत्त्वाचे ठिकाण. शीत युद्धादरम्यान पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन दरम्यान ये-जा करण्यासाठीचा हा सर्वात प्रसिद्ध आणि अधिकृत क्रॉसिंग पॉईंट होता. ज्याला मित्र राष्ट्रांनी नाव दिले होते ‘चेकपॉईंट चार्ली’. देशाचे विभाजन झाल्यावर पूर्व बर्लिनमधिल नागरिक पश्चिम बर्लिनमध्ये पलायन करत. कारण पश्चिम बर्लिन मध्ये पूर्व जर्मनीपेक्षा निर्बंध शिथिल होते आणि सुविधा जास्त होत्या.

हे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मन नेते वॉल्टर उलब्रिच यांनी १९६१ मध्ये सोव्हियत युनियनकडे बर्लिनची भिंत बांधण्यासाठी परवानगी मागितली. भिंत बांधल्यावर एक अधिकृत क्रॉसिंग पॉईंटसुद्धा बांधण्यात आला. हेच ‘चेक चार्ली पॉईंट’ (Check Point Charlie) ठिकाण शितयुद्धाचे प्रतिक समजले जाते. याच दरम्यान सोव्हिएत आणि अमेरिकेचे रणगाडे याठिकाणि एकमेकांना सामोरे गेले होते. त्यामुळे काहि काळ या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

पुढे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी चेकपॉईंट चार्लीला (Check Point Charlie) भेट दिल्याने याला ‘अमेरिकन चेकपॉईंट चार्ली’ असेही म्हणतात. पुढे बर्लिनची भिंत पाडल्यानंतर सर्वात पहिले चेकपॉईंट चार्ली बूथ २२ जून १९९०ला हटवण्यात आले. मात्र याठिकाणी त्या बूथची प्रतिकृती तयार करण्यात आली. मूळ चेक पॉईंट चार्ली चे बूथ सध्या ‘एलाईड’ संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

Check Point Charlie
Check Point Charlie
Check Point Charlie

बर्लिन येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ चेक पॉईंट चार्ली (Check Point Charlie) !

आज हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जेथून सीमा ओलांडण्यात यायची त्याठिकाणीच सध्या त्या बूथची प्रतिकृती उभारलेली आहे. रस्त्याच्या मधोमध एक सैनिकी बूथ उभारून त्याच्या बाजूने पाडलेल्या भिंतीचे काही अवशेष म्हणजे भींतीची माती,वाळू भरलेल्या गोण्या एखाद्या भींतीप्रमाणे रचून एक सेल्फि पॉईंट करण्यात आलेला आहे. याठिकाणी तुम्हाला बूथच्या आत उभे राहून फोटो काढून दिला जातो. आपल्या फोटोची प्रिंट जुन्या वर्तमानपत्रासदृश्य कागदावर मिळते. विशेष म्हणजे यासाठी तुम्ही एच्छिक पैसे द्यावे. कोणतीही सक्ती नाही.

बर्लिनच्या भिंतीच्या अवशेषांचे प्रदर्शन.

चार्ली चेक पॉईंटच्या (Check Point Charlie) बूथच्या बाजूलाच बर्लिनच्या भिंतीशी निगडित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे मोठे दालन आहे. पाडलेल्या बर्लिन भिंतीतील दगड, मातीचे अवशेष, अनेक पुस्तके, वस्तू ठेवलेल्या आहेत. आपण त्या फक्त पाहू शकतो अथवा त्यांची खरेदीही करू शकतो.

बर्लिन शहर फिरताना सतत आपण सध्या अस्तित्वात नसणाऱ्या त्या बर्लिनच्या भिंतीचा मागोवा घेत रहातो. भिंतीच्या अनेक दृश्यअदृश्य पाऊलखुणा या शहरात आपल्याला दिसत रहातात. शहराच्या काही भागात तुकड्यातुकड्यात ही पाडलेली भिंत आपल्याला दिसत रहाते.

स्प्री नदीच्याकाठी वसलेले बर्लिन शहर याच नदीच्या मार्गातूनही बघता येईल अशी सुविधा येथे आहे. अनेक सुंदर वास्तूंचे बाह्यदर्शन घेण्यासाठी या नदीच्या मार्गातून पर्यटकांसाठी बोटींची सोय करण्यात आलेली आहे. दोन तीन तासांची ही जलसफर आगळा आनंद देते.

1 thought on “Check Point Charlie – A mark of the division of Germany! (Made in 1961)”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!