Pune Metro Line 3पुणेकर करणार हुश्श ! अखेर 3 नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन .

Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे ! शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान धावणाऱ्या मेट्रो लाईन 3 चे उद्धाटन 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. पहिल्या टप्प्यातील सुमारे 17 स्थानके प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.  4 नोव्हेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

पुणे : 02-11-2026  

पुणेकर आणि विशेषत: मुख्य शहर ते हिंजवडी (Pune Metro Line 3) पर्यंत रोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी आता खुशखबर आहे.  शिवाजीनगर ते मान-हिंजवडी मेट्रो लाईन तीन चे येत्या तीन नोव्हेंबरला उद्घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर मेट्रो लाईन तीन चे उद्धाटन करणार असून या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्यानं उपस्थित असणार आहे.

बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात हा उद्धाटन सोहळा दहा वाजता पार पडणार आहे. त्यानंतर चार नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता पर्यंत दर दिवशी ही मेट्रो लाईन प्रवासासाठी सुरू असणार आहे अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

किती किलोमीटरचा आहे मार्ग (Pune Metro Line 3)

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग हा एकूण 23.2 किलोमीटरचा असून या महामार्गावर एकूण 23 स्टेशन आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात पूर्ण मेट्रो मार्ग प्रवासासाठी सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण 17 मेट्रो स्टेशन पहिल्या टप्प्यात सुरू केले जाणार आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला पुणेरी मेट्रो किंवा पिंक मेट्रो असे संबोधले जाणार असून, या मेट्रो लाईन वरील मेट्रोच्या सगळ्या पायलट या महिला असणार आहेत.

पुणेरी मेट्रो कार सेटवर सोलर पॅनल लावण्यात आले असून त्या माध्यमातून 7.6 मेगावॅट वीज निर्मीती करण्यात येत आहे. मेट्रोला लागणाऱ्या एकूण शंभर टक्के वीज पैकी 30 टक्के वीज ही सोलर पॅनलच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. तसेच लवकरच पुणेरी 3 मेट्रो तिकीट आणि महा मेट्रोचे तिकीट एकाच अपवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर अभिषेक चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *