Sugar Black Marketingसाखरेचा काळाबाजार रोखण्यासाठी 400 टनांपेक्षा जास्त साखरेवर नजर, राजयभरात तपासणी सुरू.

Sugar Black Marketing : राज्यात साखरेचा होणारा काळाबाजर, साठेबाजी आणि त्यातून होणारी कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने व्यापारी, वितरक आणि मोठ्या ग्राहकांच्या साखर साठ्यावर करडी नजर ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई : 28-08-2026

साखरेचा काळाबाजार साठेबाजी (Sugar Black Marketing) आणि कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने व्यापारी, वितरक आणि मोठ्या ग्राहकांच्या साखर साठ्यावर करडी नजर ठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आज जाहीर कऱण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्यभर संयुक्त तपासणी मोहीम सुरू कऱण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या 28 जुलैच्या आदेशानुसार 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत साखरेवर साठा निर्बंध लागू आहेत. शासकीय संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता इतर विक्रेते व वितरकांना साखर मिळाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही.

प्रत्येक जिल्ह्यात तपासणी पथके (Sugar Black Marketing)

दरमहा 10 मेट्रीक टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर मिळाल्यापासून केवळ 15 दिवसांपर्यंतच साठा ठेवता येणार आहे. सर्व संबंधितांना अन्नसाठा देखरेख संकेतस्थळांवर नोंदणी करून दर शुक्रवारी साठ्याची माहिती अद्ययावत करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली असून व्यापाऱ्यांची गोदामे, पोत्याची संख्या, खरेदी-विक्री नोंदी आणि वाहतूक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

घोषित आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत किंवा नियमभंग आढळ्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कारवाई केली जाईल.

साखरेचा काळाबाजार का होत आहे ? (Sugar Black Marketing)

  • कमी उत्पादन : हवामानातील बदल, अति पाऊस आणि ऊसावरील ‘रेड रॉट’ (तंबोरा) रोगामुळे ऊसाचे उत्पादन घटले आहे.
  • सणासुदीची मागणी : रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि आगामी सणांमुळे बाजारात साखरेची मागणी अचानक वाढली आहे.
  • कृत्रिम साठेबाजी :  काही व्यापाऱ्यांनी मोठा साठा लपवून ठेवून बाजारात तुटवडा निर्माण केल्याने दर वाढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!