Anganwadi Mid Day Mealअन्न आणि औषध प्रशासनाचे लक्ष आता अंगणवाड्यांवर, मुंढेंच्या थेट आदेशाने वाढला ताण.

Anganwadi Mid Day Meal : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता राज्यातील अंगणवाड्यांकडे वळवले आहे. त्यांच्या एका आदेशाने आता अंगणवाड्यांमधील बालकांना योग्य आहार मिळाला आहे. तसेच सणासुदीच्या काळातही अन्न सुरक्षिततेसाठी FDA ची विशेष तयारी करण्यात येत आहे.

मुंबई : 26-08-2026 

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील अंगणवाड्यांमधील (Anganwadi Mid Day Meal) पोषण आहार, शालेय पोषण आहार, मिड-डे मिलकडे आता लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रभर अंगणवाडी आणि शालेय आहार व्यवस्थेच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक टिकाणी विद्यार्थ्यांना निकृष्टदर्जाचे जेवण देण्यात असल्याचे समोर आले होते. भूंगे लागलेले कडधान्य, खिचडीत आळ्या आणि अस्वच्छतेच्या घटना समोर आल्या होत्या. या नवीन आदेशामुळे शालेय पोषण आहारात मापात पाप करणाऱ्यांचे धाबे दणाणार आहे.

सध्या तुकाराम मुंढे यांच्या काही मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. तसेच त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अनेक स्तरांवरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यातील एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबत उत्तर दिले आहे. आम्ही कोणालाही सोडत नाही. FDA कडून निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने कारवाईचा दावा त्यांनी केला. जवळपास दररोज तपासणी आणि कारवाईची माहिती माध्यमांना दिली जाते. कारवाईसोबत फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाई सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत. सरकारी असो किंवा खासगी, FDA च्या कारवाईत कोणताही भेदभाव करण्यात येत नसल्याचे मुंढेंनी स्पष्ट केले.

मंत्रालयातील कॅन्टीनचीही FDA कडून तपासणी करण्यात आले. यापूर्वी आमदार निवासातील कॅन्टीनचीही तपासणी केल्याचं मुंढे यांनी सांगितलं. सरकारी आणि निमसरकारी मिळून 115 हून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमभंग आढळलेल्या आस्थापनांवर सुधारणा नोटीस आणि निलंबनाची कारवाई कऱण्यात आली. काही सरकारी-निमसरकारी आस्थांपनांचे परवानेही निलंबित केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शालेय पोषण आहार रडारवर (Anganwadi Mid Day Meal)

आमच्या दृष्टीने सरकारी किंवा खासगी अशी वेगळी कॅटेगरी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. FBO म्हणजे Food Business Operator असे आहे. नियम सर्वांसाठी समान असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी (Anganwadi Mid Day Meal) आणि मिड-डे मीलच्या व्यवस्थेवरही FDAचं लक्ष असल्याचे ते म्हणाले. अंगणवाडी, शाळांचे मिड-डे मील आणि सेंट्रल किचन्सचा तपासणीत समावेश आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात 8 ते 10 सेंट्रल किचन्सची तपासणी कऱण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सेंट्रल किचन्समधून अंगणवाडी आणि शाळांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाचे नमुने घेतले आहेत. तपासणीनंतर एका सेंट्रल किचनचा परवाना निलंबित करण्यात आला. महाराष्ट्रभर अंगणवाडी आणि शालेय आहार व्यवस्थेच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये वर्षातून किमान दोन वेळा तपासणी करण्यात आली.

दर महिन्याला किमान नमुने घेण्याचीही प्रक्रिया राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बॅलन्स्ड डायटरी स्कोप’ च्या आदेशानंतर तपासणीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. शाळा आणि अंगणवाड्यांची (Anganwadi Mid Day Meal) नियमित तपासणी FDA च्या टार्गेटमध्ये आधीच समाविष्ट आहेत. अन्नाच्या गुणवत्तेबाबत सरकारी आस्थापनांनाही कोणतीही सूट नाही, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!